मनाला सुकून देणारं गाणं, ऐकू येताच संपूर्ण गाणे ओठांवर येते, 27 वर्षांपासून प्रेक्षकांचं आवडतं
गाणं पाहिजे तर असं, जे ऐकू येताच संपूर्ण गाणं गुणगुणतात लोक. 27 वर्षांपासून सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय. ज्यामधील बस ड्रायव्हर बनतो करोडपती.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘सूर्यवंशम’ या चित्रपटाला 27 वर्षे पूर्ण झाली असली तरी या चित्रपटातील अनेक गाणी आणि प्रसंग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यापैकी ‘कोरे कोरे सपने’ हे रोमँटिक गाणे आजही सोशल मीडियावर आणि जुन्या गाण्यांच्या प्लेलिस्टमध्ये लोकप्रिय आहे.
गाण्याची पहिली ओळ ऐकताच संपूर्ण गाणे ओठांवर येते अशी या गाण्याची लोकप्रियता आहे. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशम’मध्ये अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती.
त्यांच्यासोबत सौंदर्या आणि रचना बनर्जी यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. चित्रपटाचे टीव्हीवर वारंवार प्रसारण झाल्यामुळे त्यातील अनेक प्रसंग आणि गाणी प्रेक्षकांच्या कायमच्या लक्षात राहिली.
‘कोरे कोरे सपने’ या गाण्याला कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांनी आवाज दिला आहे. प्रसिद्ध गीतकार समीर यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून अनु मलिक यांनी संगीत दिले आहे.
विशेष म्हणजे, आजच्या सोशल मीडिया आणि रील्सच्या युगातही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. Instagram Reels, YouTube तसेच जुन्या हिंदी गाण्यांच्या प्लेलिस्टमध्ये ‘कोरे कोरे सपने’ आजही पाहायला आणि ऐकायला मिळते.