32 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याने सनी देओल- अमिताभ बच्चन यांच्यात पाडली फूट; पुन्हा कधीच एकत्र केलं नाही काम

बॉलिवूडचे शहनशाह अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करत आहेत. तर अभिनेता सनी देओललाही इंडस्ट्रीत जवळपास 42 वर्षे झाली आहेत. या दोघांनी एकत्र कामसुद्धा केलं आहे. परंतु 32 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोघांमध्ये फूट पाडली होती.

| Updated on: Apr 23, 2026 | 11:48 AM
1 / 6
अमिताभ बच्चन आणि सनी देओल हे हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सनी देओल आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र कामसुद्धा केलं आहे. परंतु तो चित्रपट 32 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्यांनी कधीच एकत्र काम केलं नाही.

2 / 6
सनी देओलने 1983 मध्ये 'बेताब' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याने अमृता सिंहसोबत मुख्य भूमिका साकारली होती. सनीच्या करिअरमधील हा पहिलाच चित्रपट तुफान हिट ठरला होता. तर अमिताभ बच्चन यांनी 1969 मध्ये करिअरची सुरुवात केली होती. या दोघांना 1994 मध्ये एकाच चित्रपट एकत्र काम करण्याची संधी मिळाली होती.

3 / 6
सनी आणि बिग बींनी एकत्र फक्त एकाच चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीच एकत्र स्क्रीन शेअर  केला नाही. या दोघांनी ज्या एकमेव चित्रपटात काम केलं, त्याचं नाव आहे 'इंसानियत'. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटा चंकी पांडे यांचीही भूमिका होती. यामध्ये अमिताभ बच्चन हे इन्स्पेक्टर अमर पाल सिंहच्या भूमिकेत होते. तर सनी देओलने करीम लाला आणि चंकी पांडेनं हरिहरनची भूमिका साकारली होती.

4 / 6
या चित्रपटादरम्यान सनी देओल आणि अमिताभ बच्चन यांच्यात बरेच गैरसमज निर्माण झाले होते, असं म्हटलं जातं. एकीकडे बिग बी सनीला तगडा स्पर्धक मानत होते, तर सनीला वाटत होतं की चित्रपटांमध्ये फक्त मोठ्या कलाकारांनाच महत्त्व दिलं जातं.

5 / 6
आयएमडीबीच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन हे सनी देओलला त्यांचा स्पर्धक मानू लागले होते. सनीच्या कामगिरीला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळू लागत होता. याच कारणामुळे तो माझ्याकडे उत्तम काहीतरी करतोय, अशी असुरक्षितता बिग बींच्या मनात निर्माण झाली होती. तर सनी देओलला वाटू लागलं होतं की बॉलिवूडमध्ये सुपरस्टार्सनाच अधिक डिमांड असते आणि नव्या कलाकारांसोबत अन्याय केला जातो.

6 / 6
'इंसानियत' या चित्रपटात अमिताभ बच्चन, सनी देओल आणि चंकी पांडे यांच्यासोबत रवीना टंडन, अनुपम खेर, विनोद मेहरा, आफताब शिवदासानी, जया प्रदा, नूतन, सोनम, प्रेम चोपडा, शफी इनामदार, सदाशिव अमरापूरकर, पल्लवी जोशी, गोगा कपूर आणि आलोक नाथ अशी कलाकारांची मोठी फौजच होती. टोनी जुनेजा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाने भारतात जवळपास 5.76 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Follow Us