हे रोमँटिक गाणं ऐकताच नाराज झालेली गर्लफ्रेंड देखील हसू लागते, 44 वर्षांपासून सर्वांचं आवडतं

44 वर्षांपूर्वीच अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी यांचं रोमँटिक गाणं, जे ऐकताच नाराज झालेली गर्लफ्रेंड देखील हसू लागते. आजही त्या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही.

| Updated on: Apr 04, 2026 | 7:42 PM
1 / 5
बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी यांनी एकत्र अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या अशाच एका लोकप्रिय चित्रपटातील गाण्याची आजही प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ आहे. हे गाणं म्हणजे ‘अंग्रेजी में कहते हैं आई लव यू’, जे 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खुद्दार'  या चित्रपटातील आहे.

2 / 5
5 मिनिटे 39 सेकंदांच्या गाण्यात अमिताभ बच्चन हे परवीन बाबी यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये ‘आय लव्ह यू’चा अर्थ सांगत प्रेम व्यक्त करताना दिसतात. गाण्यात परवीन बाबी सुरुवातीला रागात असल्याचं दाखवलं आहे पण हळूहळू दोघांची केमिस्ट्री खुलत जाते आणि त्या अमिताभ यांच्यासोबत डान्स करताना दिसतात.

3 / 5
या गाण्याची धून, शब्द आणि कलाकारांची केमिस्ट्री यामुळे हे गाणं त्या काळात प्रचंड गाजलं. 1980 च्या दशकात परवीन बाबी यांचं नाव सौंदर्य आणि ग्लॅमरचं प्रतीक मानलं जात होतं. लोक फक्त त्यांना पाहण्यासाठीही थिएटरमध्ये जात होते.

4 / 5
आज तब्बल 44 वर्षांनंतरही ‘अंग्रेजी में कहते हैं आई लव यू’ हे गाणं प्रेक्षकांच्या मनात तितकंच ताजं आहे. त्या काळात प्रेम व्यक्त करण्याची शैली साधी, निरागस आणि भावनिक असायची, जी सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडायची.

5 / 5
या चित्रपटाचे बजेट सुमारे 2 कोटी 30 लाख रुपये होते तर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जवळपास 7 कोटी रुपयांची कमाई केली होती, जी त्या काळात मोठं यश मानलं जात होतं. या गाण्यामुळेही चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळाली आणि परवीन बाबी यांच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली.

Follow Us