इराण अमेरिकेला देणार 450 किलोग्रॅम युरेनियम, त्यापासून नेमके किती अणुबॉम्ब तयार होऊ शकतात?

इराण आणि अमेरिकेमध्ये जरी युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी देखील अजूनही मध्य पूर्वेत मोठा तणाव असल्याचं दिसून येत आहे. आता अशी देखील माहिती समोर येत आहे की, इराण आपला युरेनियमचा साठा अमेरिकेकडे सोपवणार आहे.

| Updated on: Apr 19, 2026 | 4:52 PM
1 / 8
अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही मोठा तणाव पहायला मिळत आहे. अमेरिकेनं घेतलेल्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आला. आता अशी देखील बातमी समोर येत आहे की, इराण अमेरिकेकडे आपल्याकडे असलेलं 450 किलोग्रॅम इनरिच्ड युरेनियम सोपवणार नाही.

2 / 8
इराणकडून  हे वृत्त फेटाळून लावण्यात आलं आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात की  450 किलोग्रॅम इनरिच्ड युरेनियम पासून किती अणुबॉम्ब तयार केले जाऊ शकतात? 450 किलोग्रॅम इनरिच्ड युरेनियम किती खतरनाक असू शकतं?

3 / 8
युरेनियमपासून किती अणुबॉम्ब तयार केले जाऊ शकतात याचा निश्चित आकडा सांगता येत नाही. मात्र अणुबॉम्ब बनवण्यासाठी युरेनियमला  90 टक्के इनरिचमेंटची गरज असते, मात्र इराणकडे सध्या जे युरेनियम आहे ते केवळ 60 टक्केच इनरिच्ड आहे.

4 / 8
जर समजा भविष्यात इराणने हे युरेनियम 90 टक्के इनरिच्ड केलं तर इराण तेवढ्या युरेनियमपासून कमीत कमी 10 ते 15 अणुबॉम्ब बनवू शकतो, असा अंदाज संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

5 / 8
 युरेनियम हे जेव्हा 60 टक्के शुद्ध  होते तेव्हा ते अणुबॉम्ब तयार करण्याच्या प्रक्रियेपासून अत्यंत जवळ असते, मात्र जोपर्यंत ते 90 टक्के शुद्ध होत नाही, तोपर्यंत त्याच्यापासून अणुबॉम्ब निर्माण केला जाऊ शकत नाही. आता हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे की? इराण अमेरिकेला युरेनियम सोपवणार की नाही सोपवणार?

6 / 8
संरक्षण तज्ज्ञांच्या मतानुसार  450 किलोग्रॅम इनरिच्ड युरेनियम ही फार मोठी युद्ध सामुग्री मानली जाते. यापासून कमीत कमी 10 ते 15 अणुबॉम्ब सहज तयार होऊ शकतात, मात्र त्यासाठी ते युरेनियम 90 टक्के शुद्ध असणं गरजेचं आहे.

7 / 8
दरम्यान यावरूनच अमेरिका आणि इराणध्ये युद्ध सुरू झालं आहे. अमेरिकेकडून इराण अणुबॉम्ब तयार करत असल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यानंतर अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला केला.

8 / 8
हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होतं, शेवटी 40 व्या दिवशी युद्धविराम झाला आहे. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही मध्य पूर्वेत तणाव कायम आहे.

Follow Us