5 मिनिटांचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे ऐकलं तरी दिवसभर लोक गुणगुणतात, 49 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय

5 मिनिट 29 मिनिटांचं सर्वात रोमँटिक गाणं, ज्याची 49 वर्षानंतर देखील क्रेझ कायम. आजही गाणं ऐकलं तरी लोक दिवसभर गुणगुणतात. एकदा नाही तर पुन्हा-पुन्हा गाणं ऐकतात लोक.

| Updated on: Jun 11, 2026 | 10:15 AM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि सदाबहार प्रेमगीतांपैकी एक मानले जाणारे ‘कभी कभी मेरे दिल में’ हे गाणे आजही रसिकांच्या मनात तितकेच जिवंत आहे. 1976 साली प्रदर्शित झालेल्या 'कभी कभी' या चित्रपटातील हे गाणे रोमँटिक आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि सदाबहार प्रेमगीतांपैकी एक मानले जाणारे ‘कभी कभी मेरे दिल में’ हे गाणे आजही रसिकांच्या मनात तितकेच जिवंत आहे. 1976 साली प्रदर्शित झालेल्या 'कभी कभी' या चित्रपटातील हे गाणे रोमँटिक आहे.

2 / 5

या गाण्याला ज्येष्ठ गायक मुकेश यांनी आवाज दिला होता. शब्द, संगीत आणि गायन यांचा अप्रतिम संगम झाल्यामुळे हे गाणे प्रदर्शित होताच प्रचंड लोकप्रिय झाले. 'कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए' या ओळींनी त्या काळातील प्रेमी युगुलांच्या भावना व्यक्त केल्या.

3 / 5

आजही रोमँटिक गाण्यांची चर्चा झाली की सर्वप्रथम या गाण्याची आठवण काढली जाते. सुमारे 1.4 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 3 कोटी रुपयांची कमाई करत मोठे यश मिळवले.

4 / 5

तसेच या गाण्यासाठी मुकेश यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. पाच दशकांनंतरही ‘कभी कभी मेरे दिल में’ हे गाणे प्रेम, आठवणी आणि भावनांचे अजरामर प्रतीक म्हणून ओळखले जाते.

5 / 5

आजही लोक हे गाणं यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात सर्च करून ऐकतात. हे गाणं एकदा ऐकलं तरी लोक ते गाणं दिवसभर गुणगुणतात. या गाण्याला आतापर्यंत लाखो लोकांनी ऐकलं असून ते सर्वांचं आवडतं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us