बॉलिवूडमधील 5 प्रचंड अश्लील गाणी, जी ऐकताच वाटते लाज, शेवटचं गाणं तर प्रचंड चर्चेत

बॉलिवूडमध्ये गाण्यांमधील डबल मीनिंग किंवा वादग्रस्त लिरिक्स हा नवा विषय नाही. मात्र, यापूर्वी देखील काही गाणी प्रचंड वादग्रस्त ठरलेली. कोणती आहेत ती गाणी? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Apr 17, 2026 | 2:54 PM
1 / 6
बॉलिवूडमध्ये काही दिवसांपासून पुन्हा एकदा गाण्यांच्या शब्दांवरून वाद पेटला आहे. अभिनेत्री नोरा फतेही आणि अभिनेते संजय दत्त यांच्या नव्या गाण्याला ‘सर के चुनर सर के’ प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

2 / 6
या गाण्यातील लिरिक्स अतिशय अश्लील असल्याचा आरोप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. हा प्रकार काही नवीन नाही. बॉलिवूडमध्ये यापूर्वीही अनेक गाणी त्यांच्या डबल मीनिंग किंवा वादग्रस्त शब्दांमुळे चर्चेत आली आहेत.

3 / 6
सर्वात गाजलेलं उदाहरण म्हणजे खलनायक चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं. या गाण्याला त्या काळात मोठा विरोध झाला होता. चित्रपट निर्मात्यांनी हे गाणं राजस्थानी लोकगीतावर आधारित असल्याचं सांगत त्यातील शब्दांमध्ये थेट अश्लीलता नसल्याचा युक्तिवाद केला.

4 / 6
तसेच, ऋषी कपूर आणि जुही चावला यांच्या गाण्यावरही वाद झाला होता. ‘सैंया के साथ मड़ैया में, बड़ा मजा आए रजैया में’ या ओळींवर आक्षेप घेतल्यानंतर ‘रजैया’ हा शब्द बदलून ‘लड़ैया’ करण्यात आला होता.

5 / 6
याशिवाय, गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रित ‘सरकाय लेयो खटिया जाड़ा लगे’ हे गाणंही त्या काळात प्रचंड टीकेचा विषय ठरलं होतं. गाण्याचे शब्द आणि दोन्ही कलाकारांचे डान्स स्टेप्स प्रेक्षकांना अश्लील वाटले होते.

6 / 6
तसेच, संजय दत्तच्या आणखी एका गाण्यावरही वाद झाला होता. “दिन में लेती है, रात में लेती है...” अशा ओळींमुळे या गाण्याला डबल मीनिंगचा ठपका लागला होता. आजही हे गाणं बॉलिवूडमधील वादग्रस्त गाण्यांच्या यादीत गणलं जातं.

Follow Us