जुनं ते सोनं, 56 वर्षानंतरही या गाण्याची क्रेझ कायम, ऐकताच प्रेक्षकांच्या मनाला भिडतं, आजही सर्वांचं आवडतं

बॉलिवूडमधील 56 वर्षांपूर्वीच प्रचंड हिट गाणं, ज्याची आजही प्रेक्षकांमध्ये आहे प्रचंड क्रेझ. ऐकताच प्रेक्षक गुणगुणतात. तुम्ही ऐकलं का?

| Updated on: Apr 03, 2026 | 1:51 PM
1 / 5
बॉलिवूडच्या सुवर्णकाळातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. ज्यामध्ये हेमा मालिनी यांच्या गाण्यांची क्रेझ आजही कायम आहे. त्यांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांपैकी एक गाणं आजही तितकंच ताजं वाटतं, जसं ते प्रदर्शित झालं त्या काळात वाटत होतं.

बॉलिवूडच्या सुवर्णकाळातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. ज्यामध्ये हेमा मालिनी यांच्या गाण्यांची क्रेझ आजही कायम आहे. त्यांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांपैकी एक गाणं आजही तितकंच ताजं वाटतं, जसं ते प्रदर्शित झालं त्या काळात वाटत होतं.

2 / 5

56 वर्षांपूर्वी आलेलं क्लासिक रोमँटिक गाणं 'ओ मेरे राजा' आजही संगीतप्रेमींच्या मनात घर करून आहे. हे गाणं 1972 साली प्रदर्शित झालेल्या जॉनी मेरा नाम या चित्रपटातील आहे.

3 / 5

या गाण्याची खासियत म्हणजे त्याची मधुर धून, साधे पण अर्थपूर्ण बोल आणि गायनातील अप्रतिम केमिस्ट्री. त्यामुळे हे गाणं केवळ ऐकण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही तर ते मनाला भिडतं आणि ऐकणाऱ्यांना रोमान्सच्या दुनियेत घेऊन जातं.

4 / 5

सौंदर्यासोबतच हेमा मालिनी त्यांच्या गाण्यामुळे देखील प्रचंड चर्चेत होत्या. त्या काळातील गाण्यांचं चित्रिकरण, अभिनय आणि एक्सप्रेशन्स इतके प्रभावी असायचे की प्रेक्षक स्वतःला त्या गाण्यांशी जोडून घेत. त्यामुळेच त्यांची गाणी आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत.

5 / 5

आजच्या आधुनिक काळात संगीताची शैली बदलली असली तरी 70 च्या दशकातील गाण्यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. त्या गाण्यांमध्ये असलेली निरागसता आणि भावनिक खोली आजच्या गाण्यांमध्ये फार कमी प्रमाणात दिसते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us