5 मिनिट 27 सेकंदाचं रोमँटिक गाणं, जे 57 वर्षांपासून प्रत्येकाच आवडतं, आजही ऐकलं की गुनगुनतात लोक

काळ बदलला, संगीताचे स्वरूप बदलले, मात्र 57 वर्षांनंतरही या गाण्याची जादू अजूनही तशीच आहे. आजही हे गाणं चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन क्लासिक गाण्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तुम्ही ऐकलं का?

| Updated on: Jun 06, 2026 | 11:12 AM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीतील 60, 70 आणि 80 चे दशक हे सुवर्णयुग मानले जाते. त्या काळातील गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती तर प्रत्येक गाण्यामागे एक कथा, भावना आणि अथक मेहनत दडलेली असायची. त्यामुळेच त्या काळातील अनेक गाणी आजही रसिकांच्या हृदयात अढळ स्थान राखून आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीतील 60, 70 आणि 80 चे दशक हे सुवर्णयुग मानले जाते. त्या काळातील गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती तर प्रत्येक गाण्यामागे एक कथा, भावना आणि अथक मेहनत दडलेली असायची. त्यामुळेच त्या काळातील अनेक गाणी आजही रसिकांच्या हृदयात अढळ स्थान राखून आहेत.

2 / 5

अशाच अजरामर गाण्यांपैकी एक म्हणजे ‘कोरा कागज था ये मन मेरा’. तब्बल 57 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आराधना’ या चित्रपटातील हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या आवडीच्या गाण्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे.

3 / 5

प्रेमाच्या निरागस भावनांना शब्द आणि सुरांमधून सुंदरपणे व्यक्त करणाऱ्या या गीताने त्या काळात प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. ‘कोरा कागज था ये मन मेरा’ या गाण्याला प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी आपला जादुई आवाज दिला होता.

4 / 5

गाण्यात प्रेमाची सुरुवात अत्यंत नाजूक आणि सुंदर पद्धतीने मांडण्यात आली आहे. त्यातील सुरेल धून आणि भावपूर्ण शब्दांमुळे हे गाणं आजही नव्या पिढीला आकर्षित करताना दिसते.

5 / 5

‘कोरा कागज था ये मन मेरा’ हे गाणे प्रदर्शित होऊन जवळपास सहा दशके उलटली असली तरी त्याची लोकप्रियता आजही कायम आहे. संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये या गाण्याचे विशेष स्थान आहे. विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे गाणे आजही मोठ्या आवडीने ऐकले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us