69 वर्षीय सुपरस्टारचा 21 वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स, ओलांडल्या होत्या सर्व मर्यादा, चित्रपट पाहून प्रेक्षक झालेले थक्क
69 वर्षीय सुपरस्टार ज्याने 21 वर्षीय अभिनेत्रीसोबत केला होता प्रचंड रोमान्स. चित्रपट पाहून प्रेक्षक देखील हादरले होते. रोमान्स दरम्यान तोडल्या होत्या सर्व मर्यादा.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते नंदमुरी तारक रामाराव यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला आहे. त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांचा समावेश असून आजही त्यांना प्रचंड आदराने पाहिले जाते.

मात्र त्यांच्या एका चित्रपटामुळे त्या काळात मोठी चर्चा रंगली होती आणि प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले होते. एनटीआर यांनी वयाच्या तब्बल 69व्या वर्षी एक असे प्रमुख पात्र साकारले होते, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. पडद्यावर त्यांनी केवळ 21 वर्षांच्या अभिनेत्रीबरोबर रोमँटिक भूमिका साकारली होती.

इतक्या मोठ्या वयाच्या फरकामुळे त्या काळात चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. हा चित्रपट होता सम्राट अशोक, जो 1992 साली प्रदर्शित झाला. महान सम्राट अशोक यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात एनटीआर यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील त्यांनी स्वतः केली होती. त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले, मात्र चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही.

या चित्रपटात नवोदित अभिनेत्री वाणी विश्वनाथ हिने एनटीआर यांच्यासोबत काम केले होते. त्या वेळी ती आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत होती. मोठ्या स्टारसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे ती चर्चेत आली पण तिच्या आणि एनटीआर यांच्या वयातील मोठ्या अंतरामुळे प्रेक्षकांना धक्का बसला होता.