गोविंदाच्या प्रत्येक सुपरहिट चित्रपटामागे आहे साउथ कनेक्शन, 2 नंबरचा तर प्रचंड कॉमेडी
90 च्या दशकातील सर्वांत मोठा कॉमेडी सुपरस्टार, ज्याचे प्रत्येक हिट चित्रपट आहेत साउथ चित्रपटाचे रिमेक. ज्यामध्ये बॉलिवूड चित्रपटांनी केली प्रचंड कमाई.

बॉलिवूडमध्ये कॉमेडी चित्रपटांचा विषय निघाला की सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते गोविंदाछं. आपल्या भन्नाट कॉमिक टायमिंग, भन्नाट डान्स आणि हटके अभिनयामुळे गोविंदाने 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं.

मात्र, गोविंदाचे काही गाजलेले सुपरहिट चित्रपट हे प्रत्यक्षात दक्षिण भारतीय चित्रपटांचे हिंदी रीमेक होते, हे अनेकांना माहिती नाही. विशेष म्हणजे या चित्रपटांनी हिंदी बॉक्स ऑफिसवर मूळ चित्रपटांपेक्षाही अधिक यश मिळवलं. चला तर मग, गोविंदाच्या अशाच काही लोकप्रिय चित्रपटांविषयी जाणून घेऊया.

1995 मध्ये प्रदर्शित झालेला ‘कुली नं. 1’ हा गोविंदाच्या कारकिर्दीतील सर्वात लोकप्रिय कॉमेडी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात करिश्मा कपूर आणि गोविंदाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती, मात्र हा चित्रपट मूळ तमिळ चित्रपट 'सिन्ना मॅपलाई' याचा हिंदी रीमेक होता.

1993 मध्ये आलेला‘आंखें’ हा एक भन्नाट अॅक्शन-कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटात गोविंदासोबत चंकी पांडे मुख्य भूमिकेत दिसला होता. दोघांच्या जोडीने प्रेक्षकांना भरपूर हसवलं. हा चित्रपट कन्नड चित्रपट 'किट्टू पुट्टू' आणि तमिळ चित्रपट अनुबावी राजा अनुबावी यांच्यापासून प्रेरित हिंदी रीमेक मानला जातो.

1999 मध्ये रिलीज झालेला ‘हसीना मान जाएगी’ हा चित्रपटही मोठा हिट ठरला होता. या चित्रपटात गोविंदासोबत संजय दत्त आणि करिश्मा कपूर झळकले होते. हा चित्रपट जुन्या हिंदी चित्रपट 'प्यार किये जा' आणि तमिळ चित्रपट 'काधलिक्का नेरमिल्लई' यांचा हिंदी अवतार होता.