मालेगावातील शेतकऱ्याची कमाल, बांगलादेशी-जपानी आंब्यांची फुलवली बाग, वैशिष्ट्ये ऐकून चाट पडाल..
नाशिकच्या मालेगावात जपानच्या लाल आंब्याची आणि बांगलादेशी आंब्याची जोरदार चर्चा आहे. आंबा म्हटला तर देशातील ठराविक जातींची नाव सर्वांना ठाऊक असतात. मात्र या परदेशी आंब्यांच्या शेतीतूनही शेतकरी स्वत:ची चांगली कमाई करु शकतात.

Japanese Miyazaki mangoes
- पारंपारिक आंब्यांच्या शेती करण्याच्या ऐवजी आता शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. नाशिकच्या मालेगावातील एका शेतकऱ्याने पश्चिम बंगालवरून रोपे आणून प्रायोगिक तत्त्वावर या अनोख्या आंब्याची शेती केली आहे.
- जपानच्या मियाझाकी आंबा हा प्रचंड महागडा आंबा आहे, या लाल आंब्यासोबत बांगलादेशच्या कॅटिमॉन जातीच्या आंब्याची लागवड नाशिक- मालेगावातील शेतकऱ्याने केली असून वर्षातून दोनदा येणाऱ्या आंब्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. या आंब्यांना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे.
- मालेगाव तालुक्यातील अजंग शिवारात भाऊसाहेब कौतिक पवार यांच्या मळ्यात जपानच्या मियाझाकी लाल आंब्याची तसेच बांगलादेशच्या काटेमोन आंब्याची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात आली आहे.
- देशभरात मियाझाकी आंब्याची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याची चर्चा असून त्यामुळे या आंब्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. पश्चिम बंगालवरून ही रोपे आणून लागवड करण्यात आली आहे. देशी आंबे वर्षातून एकदाच येतात, मात्र बांगलादेशचा काटेमोन आंबा वर्षातून दोनदा उत्पादन देतो.
- बांगलादेशच्या आंब्याला रोप लावल्यानंतर सुमारे दोन वर्षांत फळधारणा सुरू होते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी या फळबागेला भेट दिली आहे. सध्या पंचक्रोशीत या जपानी लाल आंब्याची आणि बांगलादेशी आंब्याची जोरदार चर्चा सुरू असून हे आंबे पाहण्यासाठी नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने बागांना भेट देत आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us