प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, पण आधी केलेलं चक्क झाडाशी लग्न; तिनेच सांगितला तो भयानक अनुभव!

बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा आता आई होणार आहे. सोशल मीडियावर तिने ही खुशखबर दिली आहे. दरम्यान, तिचे खरे लग्न होण्याआधी तिला एका झाडाशी लग्न करावं लागलं होतं. तिनेच याबाबत सांगितलेलं आहे.

| Updated on: Apr 06, 2026 | 9:45 PM
1 / 5
बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना लवकरच आई होणार आहे. तशी खुशखबर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ही खुशखबर समजताच आता तिचे चाहते तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत. तिने पती वरुण बंगेरा याच्यासोबत काही छान फोटो शेअर करून ही गोड बातमी दिली आहे.

बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना लवकरच आई होणार आहे. तशी खुशखबर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ही खुशखबर समजताच आता तिचे चाहते तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत. तिने पती वरुण बंगेरा याच्यासोबत काही छान फोटो शेअर करून ही गोड बातमी दिली आहे.

2 / 5

दरम्यान, करिश्मा आता आई होणार असली तरी या निमित्ताने तिच्या खासगी आयुष्याबाबत खूप चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी ती अभिनेत्री सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये पाहुणी म्हणून आली होती. या पॉडकास्टमध्ये तिने तिच्या आयुष्यातील एक गुपित गोष्ट सांगितली होती.

3 / 5

तिच्या कुंडलीत मांगलिक दोष होता. हा दोष दूर करण्यासाठी तिला वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या असे तिने या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं. हाच दोष दूर व्हावा म्हणून तिने चक्क झाडासोबत लग्न केलं होतं, असंही तिने सांगितलं आहे.

4 / 5

सोबतच एका देवासोबतही माझे लग्न लावून देण्यात आले, असंही ती या पॉडकास्टमध्ये सांगताना दिसतेय. या साऱ्या गोष्टी मी जेव्हा केल्या तेव्हा मी खूपच तरुण होते. माझ्या आईचा या सर्व गोष्टींवर खूप विश्वास होता, असे तिने या पॉडकास्टमध्ये सांगितले होते.

5 / 5

सोबतच माझी जन्मपत्रिका माझ्या आईजवळह होती. माझ्या आईला कुंडलीतील साडेसातीबद्दलही ज्ञान होतं, हेही ती सांगायला विसरली नाही. दरम्यान, करिश्मा आता ऑगस्ट 2026 मध्ये एका गोड बाळाला जन्म देणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us