निसर्गाच्या सानिध्यात मराठी अभिनेत्रीचं हॉट फोटोशूट, सौंदर्य आणि लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
माळशेज घाटात केतकी कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज; फोटो पाहून चाहत्यांनी फोटोंवर केला लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव.
1 / 5

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री केतकी कुलकर्णीने आपल्या दमदार अभिनयातून ‘अनिका’ ही नकारात्मक भूमिका विशेष गाजवली आहे.
2 / 5
तिच्या अभिनयाची आणि हटके अंदाजाची सोशल मीडियावरही नेहमीच चर्चा होताना दिसते. दरम्यान, केतकी कुलकर्णीने नुकतेच महाराष्ट्रातील निसर्गरम्य माळशेज घाटात खास फोटोशूट केले आहे.
3 / 5
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माळशेज घाटाच्या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात केतकीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.
4 / 5
या फोटोशूटसाठी तिने सुंदर सिल्क साडी नेसली असून, पारंपरिक साडीतील तिचा आकर्षक आणि बोल्ड लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
5 / 5
केतकीने फोटोंसोबत ‘Still Glowing, Still Growing’ असे खास कॅप्शन दिले आहे. घाटाच्या निसर्गसौंदर्यात खुललेला तिचा हा लूक चाहत्यांना चांगलाच भावला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us