मलायकाच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची चाहूल? 19 वर्षांनी लहान हर्ष मेहतासोबत झाली स्पॉट, चर्चांना उधाण

अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका अरोराला पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं दिसत आहे. नुकतीच ती हर्ष मेहतासोबत स्पॉट झाली. तिचे हे फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

| Updated on: Aug 30, 2026 | 3:39 PM
1 / 5
मलायका अरोरा ही नेहमी तिच्या जीम लुकने आणि वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अशातच आता  अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मलायका अरोरा ही नेहमी तिच्या जीम लुकने आणि वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अशातच आता अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

2 / 5

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका सध्या डायमंड व्यावसायिक हर्ष मेहता यांना डेट करत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हर्ष हे मलायकापेक्षा 19 वर्षांनी लहान असल्याचे सांगितले जात आहे.

3 / 5

काही दिवसांपूर्वी मलायकाने आईच्या घरी बॉयफ्रेंड हर्षसोबत ओणमचा सण साजरा केल्याचे समोर आले होते. या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

4 / 5

त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी मलायका आणि हर्ष पुन्हा एकदा एकत्र दिसले. मलायकाच्या रेस्टॉरंटबाहेर हर्ष मेहता स्पॉट झाले. त्याचवेळी मलायका निळ्या जीन्स आणि पांढऱ्या टॉपमध्ये हसतमुख अंदाजात रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती वीकेंड एन्जॉय करत असल्याची चर्चा रंगली.

5 / 5

विशेष म्हणजे मलायकाचा मुलगा अरहान खानदेखील आपल्या मित्रांसोबत याच रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी पोहोचला होता. त्यामुळे मलायकाच्या नात्याबाबत अरहानला कोणतीही हरकत नसल्याचे चाहते अंदाज लावत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us