‘फँड्री’मधील शालूच्या हॉट लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, हिरव्या साडीमध्ये दिल्या जबरदस्त पोज, फोटो चर्चेत

'फँड्री'चित्रपटातील शालूच्या नवीन साडीमधील लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या हिरव्या रंगाच्या साडीमधील पाण्यातील हटके पोजने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

| Updated on: Aug 30, 2026 | 2:02 PM
1 / 5
13 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘फँड्री’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी छाप पाडली होती. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटातील जब्या आणि शालू ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

13 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘फँड्री’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी छाप पाडली होती. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटातील जब्या आणि शालू ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

2 / 5

‘फँड्री’नंतर राजेश्वरी खरातने मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच तिने साडीतील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5

तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोशूटमध्ये राजेश्वरीने हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर मॅचिंग केशरी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.

4 / 5

नदीच्या किनारी तसेच नदीच्या पाण्यात उतरून तिने हे खास फोटोशूट केलं आहे. तिचा साधा, पारंपरिक आणि आकर्षक लूक चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

5 / 5

राजेश्वरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी कमेंटमध्ये लव्ह इमोजी शेअर करत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us