दक्षिणेकडील मोठी अभिनेत्री होणार आई, 20 वर्षांपासून बघत होती वाट

सध्या एक प्रसिद्ध अभिनेत्री चांगलीच चर्चेत आहे. तिने नुकताच दुसरे लग्न केले. लग्नाच्या काही महिन्यानंतर आता ती आई होणार असल्याचे समोर आले आहे. मातृत्त्वावर बोलताना तिने आनंद व्यक्त केला आहे. तसेच गेल्या 20 वर्षांपासून ती याची वाट पाहात असल्याचे म्हटले आहे.

| Updated on: Jul 21, 2026 | 3:01 PM
1 / 5
फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री या कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगामी सिनेमामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या अशीच एक दक्षिणेकडील अभिनेत्री चर्चेत आहे. ती आयुष्याच्या नव्या वळणार पोहोचली आहे. जवळपास गेल्या 20 वर्षांपासून वाट पाहात असलेल्या त्या क्षणांचा ती सध्या आनंद घेताना दिसत आहे. आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून सुपरस्टार समांथा रुथ प्रभू आहे.

2 / 5
समांथाचा नुकताच ‘मा इंटी बंगारम’ या सिनेमाने जगभरात खळबळ माजवली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने तिच्या खासगी आयुष्यावरही मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. तिने आयुष्यातील नव्या अध्यायाला सुरुवात केल्याचे सांगितले आहे.

3 / 5
पिंकव्हिलाशी बोलताना समांथाला, आयुष्याच्या एका नवीन टप्प्यावर तुम्ही पाऊल टाकत आहात, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. मातृत्व हे अनेकदा एक विशेष आणि जीवन बदलणारा अनुभव असल्याचे म्हटले जाते. तुमच्या आयुष्यातील या टप्प्याचे वर्णन तुम्ही कसे कराल आणि या अनुभवाने स्वतःबद्दलचा तुमचा दृष्टिकोन व पुढील प्रवासाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर समांथाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

4 / 5
"हे नक्कीच नवीन आणि रोमांचक आहे. पण मी या क्षणाची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. मला नेहमीच आई व्हायची इच्छा होती, त्यामुळे मला खात्री आहे की मी यात माझे सर्वस्व झोकून देईन" असे समांथा म्हणाली.

5 / 5
पुढे ती म्हणाली, "आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल माझ्या मनात नेहमीच एक वेगळी ओढ आणि उत्साह राहिला आहे. पण आता मला स्वतःमध्ये एक वेगळी, नवी ताकद आणि एक नवा उद्देश जाणवतोय. या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे, मी रोज काहीतरी नवीन शिकत आहे आणि पुढे जे काही घडेल, त्याचा स्वीकार करण्यासाठी सज्ज होत आहे."

Follow Us