या अभिनेत्रीचे तब्बल 6 वेळा मोडले लग्न, शेवटी 7 वे लग्न ठरले यशस्वी, सौतनसोबत करतेय संसार
1 किंवा 2 वेळा नाही तर बॉलिवूडमधील या अभिनेत्रीचे 6 वेळा मोडले लग्न. शेवटी सातवे लग्न ठरले यशस्वी. आता सौतनसोबत आनंदाने करतेय संसार. कोण आहे ही अभिनेत्री?

90 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीत ग्लॅमरसोबतच कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याचीही मोठी चर्चा होत असे. अशाच चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री सोनिका गिल यांच्या आयुष्याची कहाणी अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे.

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या गाजलेल्या ‘राम लखन’ चित्रपटाशी संबंधित प्रकल्पांमुळे सोनिका गिल यांना ओळख मिळाली. सुरुवातीच्या काळात त्यांच्या अभिनय आणि स्क्रीन प्रेझेन्सचे कौतुक झाले. मात्र, करिअर उंचावत असतानाच त्यांच्या आयुष्यात मोठे संकट आले.

एका गंभीर रस्ते अपघातामुळे त्यांच्या करिअरला मोठा फटका बसला. या अपघातानंतर त्यांच्याकडून अनेक महत्त्वाच्या चित्रपटांच्या संधी निघून गेल्या. त्यामध्ये संजय दत्तच्या ‘खलनायक’ चित्रपटाचाही समावेश असल्याचे सांगितले जाते.

अपघातानंतर त्या दुबईमध्ये स्थायिक झाल्या. मात्र, वैयक्तिक आयुष्यातील अडचणी त्यांचा पाठपुरावा करत राहिल्या. सोनिका यांच्या आयुष्यात तब्बल सहा वेळा विवाह ठरले, परंतु विविध कारणांमुळे प्रत्येक वेळी ते मोडले. अखेर सातव्या प्रयत्नात त्यांचे लग्न उद्योगपती मितेश रुगानी यांच्याशी झाले.

एका मुलाखतीत सोनिका यांनी सांगितले होते की, एका ज्योतिषाने त्यांना ‘मांगलिक’ असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सातव्या विवाहापूर्वी विशेष पूजा करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा विवाह यशस्वी झाला. सौतनसोबत एकत्र आनंदाने त्या राहत आहेत.