पीरियड्सच्या पहिल्या दिवशी पूलमध्ये 8 तास या अभिनेत्रीने केलेलं शूटिंग, सांगितला अनुभव

या अभिनेत्रीने पीरियड्सच्या पहिल्या दिवशी देखील पूलमध्ये 8 तास केलेलं शूटिंग. अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभव. नेमकं काय म्हणाली अभिनेत्री?

| Updated on: May 31, 2026 | 12:23 PM
1 / 6
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सुरभी चंदना सध्या तिच्या नव्या भूमिकेमुळे चर्चेत आली आहे. 'इश्कबाज' आणि 'नागिन' सारख्या गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी सुरभी आता निर्माती म्हणूनही नवी इनिंग सुरू करत आहे.

2 / 6
अलीकडेच एका मुलाखतीत सुरभीने तिच्या नव्या प्रोजेक्टबरोबरच महिलांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर मोकळेपणाने भाष्य केले. मासिक पाळी आणि त्यादरम्यान शूटिंग करताना येणाऱ्या अडचणींबाबत तिने अनुभव शेअर केला.

3 / 6
सुरभी म्हणाली की, पीरियड्स ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अतिशय नैसर्गिक आणि सामान्य प्रक्रिया आहे. मात्र, आजही अनेकजण या विषयावर बोलताना संकोच करतात किंवा लाज बाळगतात. लोक पीरियड्सबद्दल बोलण्यास का घाबरतात, हे मला समजत नाही.

4 / 6
जर एखादी अभिनेत्री दिवसाचे 14 तास शूटिंग करत असेल तर त्या काळात पीरियड्स येणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. शूटिंगदरम्यान अशा परिस्थितीसाठी ती नेहमीच तयार असते. कधीकधी सेटवर स्पॉट दादांकडून सॅनिटरी नॅपकिन मागवावे लागले आहेत. यात काहीही गैर किंवा लाज वाटण्यासारखे नाही. हा शरीराचा नैसर्गिक भाग आहे असे सुरभीने स्पष्ट केले.

5 / 6
यावेळी तिने 'इश्कबाज' मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा एक अनुभवही सांगितला. मालिकेतील एका पूल सीनच्या शूटिंगच्या दिवशी तिच्या मासिक पाळीचा पहिला दिवस होता. त्यामुळे ती सुरुवातीला चिंतेत होती. तिने लगेच निर्माती गुल खान यांना फोन करून परिस्थिती सांगितली. त्यावर गुल खान यांनी तिला धीर देत, असे होत असते, काळजी करू नकोस असे सांगितले.

6 / 6
सुरभीच्या मते, ती ज्या गोष्टीबद्दल घाबरत होती, तितकी परिस्थिती अवघड नव्हती. मी जवळपास सहा ते आठ तास पूलमध्ये शूटिंग केले. वेळ कसा गेला हेही कळले नाही असे तिने सांगितले.

Follow Us