लग्न न करताच 24 व्या वर्षी ही अभिनेत्री झाली आई, मॅनेजरने देखील तिच्यासोबत काम करण्यास दिलेला नकार

बॉलिवूडमधील ही अभिनेत्री वयाच्या 24 व्या वर्षी लग्न न करता झालेली आई. अशातच तिच्या मॅनेजरने देखील तिच्यासोबत काम करण्यास दिला होता नकार. नेमकं कारण काय?

| Updated on: May 31, 2026 | 10:58 AM
1 / 5
बॉलिवूडमध्ये कोणत्याही गॉडफादरशिवाय स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींचा उल्लेख झाला की सुष्मिता सेनचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आपल्या सौंदर्यामुळे, अभिनयामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहिलेली सुष्मिता सेनने वैयक्तिक आयुष्यातही अनेक धाडसी निर्णय घेतले.

2 / 5
आज सिंगल मदर म्हणून अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या सुष्मिता सेनने 2000 साली रेनी सेन हिला दत्तक घेतले. त्यानंतर 2010 मध्ये अलीशा हिचेही तिने आपल्या कुटुंबात स्वागत केले. मात्र हा निर्णय घेताना तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.

3 / 5
विशेष म्हणजे, तिच्या या निर्णयामुळे तिचा स्वतःचा मॅनेजरही तिला सोडून गेला होता. एका मुलाखतीत सुष्मिता सेनने सांगितले की, रेनीला दत्तक घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तिच्या मॅनेजरने तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.

4 / 5
त्याचे मत होते की, एवढ्या कमी वयात सिंगल मदर बनल्यानंतर चित्रपटसृष्टीत तिला काम मिळणार नाही आणि तिचे करिअर पूर्णपणे संपुष्टात येईल. सुष्मिताने सांगितले की, मॅनेजरने तिला स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, 24 वर्षांची असताना आई बनणाऱ्या अभिनेत्रीचे काम मी सांभाळू शकत नाही. आता तुला चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका तर दूरच, साइड रोलसुद्धा मिळणार नाहीत."

5 / 5
मात्र सुष्मिताने इतरांच्या मतांकडे दुर्लक्ष करत आपल्या मनाचा आवाज ऐकला आणि रेनीला दत्तक घेण्याचा निर्णय कायम ठेवला. लोकांनी ज्या निर्णयामुळे तिचे करिअर संपेल असे भाकीत केले होते, त्याच निर्णयानंतर तिच्या कारकिर्दीला नवी उंची मिळाली.

Follow Us