Prahaar the Box Office: आदिनाथ कोठारेचा स्वॅग! प्रहारला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
Prahaar the Box Office: ललित प्रभाकरचा प्रहार हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असून अनेकांची पसंती आदिनाथ कोठारेचा सिनेमा नयी नवेलीकडे असल्याचे म्हटले जाते.

प्रहार हा सिनेमा प्रदर्शनाच्या आधीपासूनच चर्चेत होता. आता शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगली कामगिरी केली. पण विकेंडच्या स्थिर कामगिरीनंतर आता चित्रपटाच्या कमाईमध्ये घसरण होत असल्याचे चित्र आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या चार दिवसांनंतर किती कमाई केली? चला जाणून घेऊया...
प्रहार चित्रपटाने चौथ्या दिवशी १.६० कोटी रुपये ग्रॉस कलेक्शन केले आहे. यामुळे त्याची भारतातील एकूण ग्रॉस कमाई १२.५३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चित्रपटाने ३२८ शहरांतील १,०४७ थिएटरमधील २,७६० शोमध्ये १२.५% ऑक्युपंसी नोंदवली आहे. तसे पहायला गेले तर प्रेक्षक चित्रपटाकडे पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे.
ट्रॅकटॉलिवूडनुसार, प्रहारने चौथ्या दिवशी मिळून आतापर्यंत ६१,४१२ तिकिटे विकली आहेत. चित्रपटाला ८८ फास्ट-फिलिंग शो आणि २० हाउसफुल शो आहेत. हळूहळू चित्रपटाच्या कमाईत घसरण होत असल्याचे चित्र आहे.
प्रहारने पहिल्या दिवशी २.७० कोटी रुपये कमावले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३.८० कोटी रुपये मिळाले, ज्यात ४०.९% वाढ झाली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ४.४३ कोटी रुपये कमावले, ज्यात १६.५% वाढ नोंदवली गेली. चौथ्या दिवशी आतापर्यंत त्याने १.६० कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजे चौथ्या दिवशी चित्रपटाने प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
तर दुसरीकडे आदिनाथ कोठारेचा सिनेमा ‘नयी नवेली’ची क्रेझ वाढत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटामुळे अनेकांनी प्रहारकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाने आता पर्यंत 30 कोटी रुपयांची कमाई केल्याचे बोलले जाते.