Adinath Kothare: बॉलिवूड गाजवणाऱ्या आदिनाथ कोठारेकडे एकूण किती संपत्ती?
Adinath Kothare Net Worth: मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे हा कायमच चर्चेत असतो. सध्या रामायण या सिनेमामुळे तो चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या नई नवेली या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सध्या आदिनाथची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याच्याकडे एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याच्या एकूण संपत्तीविषयी...
आदिनाथ कोठारे हा मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज निर्माते महेश कोठारे यांचा मुलगा आहे. आदिनाथ कोठारेने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्याने काही मालिकांची निर्मिती देखील केली आहे.
आदिनाथ कोठारेने मराठीसह काही हिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याची एकूण कमाई ही सिनेमा, जाहिराती आणि प्रोडक्शन हाऊसमधून होते. तो एका सिनेमासाठी लाखो रुपये मानधन घेतो.
आदिनाथ कोठारेकडे एकूण 26 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आदिनाथ कोठारे लवकरच रामायण या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री साई पल्लवी आणि अभिनेता रणबीर कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याने तगडे मानधन घेतले असल्याचे बोलले जाते.