पतीचं निधन… दोन मुले आणि सासूची जबाबदारी… महिलेने सुरु केला असा व्यवसाय

आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात... पण काही महिलांच्या आयुष्यात काही अशा घटना घडतात, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी महिलांवर येते... असं काही सोनाली देसाई यांच्यासोबत झालं... पतीच्या निधनानंतर दोन मुले आणि सासूची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली... तर जाणून घ्या सोनाली देसाई यांच्याबद्दला

| Updated on: Mar 09, 2026 | 11:45 PM
1 / 5
कराड तालुक्यातील आणे येथील युवक  कालिदास देसाई यांचे  कराड- ढेबेवाडी राज्य मार्गावर पंक्चर काढण्याचं दुकान होतं. एक वर्षांपूर्वी पंक्चर काढत असताना हवेने टायरचा स्फोट होऊन टायर व स्टेफनी डोक्याला लागून कालिदास देसाई यांचा मृत्यू झाला

2 / 5
यानंतर चार महिने दुकान बंद होतं उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने त्यांच्या पत्नी सोनाली देसाई यांनी पतीचे दुकान चालू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पती असताना पंक्चर काढण्याबाबत काही गोष्टी जाणून  घेतल्या होत्या. त्याच आधारावर त्यांनी दुकान सुरू केलं.

3 / 5
त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पुरुषालाही लाजवेल अशा पद्धतीने मोठमोठ्या गाड्यांचे चाक खोलणे स्टेफनी व टायर मधून ट्यूब बाहेर काढणे. आशा कामांमध्ये  प्राविण्य मिळवत पुन्हा व्यवसायाचा जम बसवला आहे

4 / 5
सोनाली यांचे शिक्षण हे दहावीपर्यंत झालं असून या कामात पतीच्या  मित्रांसह भाऊ आणि माहेरच्यांनी मदत केल्याचे त्यांनी सांगितले. सोनाली देसाई यांना आर्थिक मदतीची गरज असून त्यांना विधवा निराधार पेन्शन योजनेसह  महिला संबंधित शासनाच्या असलेल्या विविध योजना बाबतही माहिती नसल्यास समोर आला आहे

5 / 5
सोनाली या व्यवसायावर दोन मुले आणि सासू असा चार जणांचे कुटुंब त्या चालवत. व्यवसायातून कमाई तुटपुंजी असून सामाजिक संस्था बचत गट किंवा शासनाकडून आर्थिक मदत झाल्यास हाच व्यवसाय वाढवण्याचा मनोदय ही त्यांनी बोलून दाखवला आहे

Follow Us