2 तास 12 मिनिटाचा हॉरर सिनेमा, शेवटपर्यंत नजर हटणार नाही, पण काही सीन पाहून थरकाप उडेल

सध्या बॉलिवूडचा एक चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा सुपरनॅचरल हॉरर सिनेमा प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. आता हा सिनेमा कोणता आहे? आणि तुम्हाला पाहायचा असेल तर कुठे पाहाता येईल जाणून घ्या...

| Updated on: Apr 14, 2026 | 1:34 PM
1 / 5
हॉरर चित्रपटांचा वेगळाच आनंद असतो आणि यॉनरचे चित्रपट लोकांना खूप आवडतात. सध्या या जॉनरमध्ये अक्षय कुमारचा चित्रपट ‘भूत बंगला’ येणार असल्याने लोक उत्सुक आहेत. अक्षय कुमारचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी आज आपण एक सुपरनॅचरल हॉरर-थ्रिलर चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. या चित्रपटात तुम्हाला सस्पेंस, रोमांच, ट्विस्ट आणि टर्न्स भरपूर पहायला मिळतील.

2 / 5

आज आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्या चित्रपटाचे नाव आहे ‘शैतान.’ या चित्रपटात अजय देवगन, जानकी बोदीवाला आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २०२४ मध्ये थिएटरमध्ये रिलीज झाला होता. वर्ड ऑफ माउथच्या जोरावर हा चित्रपट प्रेक्षकांचा आवडता बनला होता.

3 / 5

चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचे झाले तर, तुम्ही लहानपणापासून घरी आई-वडील किंवा आजी-आजोबांकडून ऐकले असेल की, घराबाहेर जाताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातचे काहीही खाऊ नका. हे का सांगितले जाते, हे तुम्ही चित्रपट ‘शैतान’ पाहिल्यानंतर पूर्णपणे समजून घ्याल. या चित्रपटाची कहाणी वशीकरण आणि तांत्रिक क्रियांभोवती फिरते. हा चित्रपट ‘वश’ या मूळ तमिळ चित्रपटाची हिंदी रिमेक आहे.

4 / 5

या चित्रपटात वनराज हा कबीरला भाग पाडतो की तो आपल्या मुलीला स्वतःहून त्याच्यासोबत येण्याची परवानगी द्यावी. तसे न केल्यास तो त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला खूप त्रास देतो. वनराज स्वतःला देव म्हणवतो आणि कबीरवर जबरदस्ती करतो. ही कहाणी तुम्हाला शेवटपर्यंत बांधून ठेवेल. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

5 / 5

‘शैतान’ चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. त्यांनी प्रथमच सुपरनॅचरल हॉरर-थ्रिलर जॉनरमध्ये हात आजमावला होता आणि ते यात यशस्वी ठरले. या चित्रपटाने प्रेक्षकांना खूप घाबरवले आणि हैराण केले. चित्रपटाची कहाणी अत्यंत जबरदस्त आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us