Ajit Pawar Rare photos: बालपण ते उपमुख्यमंत्री… दिवंगत अजितदादांचे दुर्मिळ फोटो पाहिलेत का?

Ajit Pawar Rare photos: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्ताने काही खास आणि दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तुम्ही हे फोटो पाहिलेत का? एकदा नक्की पाहा.

| Updated on: Jul 21, 2026 | 2:27 PM
1 / 5
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 67व्या जयंती निमित्ताने 'अजित स्मृती, अविट स्मृती' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 67व्या जयंती निमित्ताने 'अजित स्मृती, अविट स्मृती' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

2 / 5

मुंबईतील महिलाविकास मंडळात दादांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.

3 / 5

दादांच्या राजकारणामधील जडणघडणीचे अत्यंच महत्त्वाचे असे सगळे फोटो एकत्रितपणे राष्ट्रवादीच्या माध्यमातून, प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांसाठी समोर आणण्यात आले आहेत.

4 / 5

या प्रदर्शनात दादांचे अगदी लहानपणापासूनचे फोटो ठेवण्यात आले आहेत आणि हे सगळे फोटो दुर्मिळ आहेत. हे फोटो आजपर्यंत कोणी पाहिलेले नाहीत.

5 / 5

अजित पवार यांच्याविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची उद्या जयंती आहे. या निमित्ताने अतिशय सुंदर असं चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलेल आहे ज्यात दादांच जीवन पाहायला मिळतोय. त्यांची कारकीर्द या निमित्ताने पाहायला मिळतेय. दादांचा उमदा स्वभाव, त्यांच हास्य त्यांची कठोरता हे सगळं यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. इतक सुंदर चित्रप्रदर्शन आयोजित करणाऱ्यांच अभिनंदन. शक्यता आहे की उद्याच दादांच्या जयंतीच औचित्य साधून कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न करत आहोत.'

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us