आरे देवा! पैठणी साडीवर बिकिनी ब्लाऊज, बोल्ड अभिनेत्रीचा नवीन लूक पाहून सर्वांनाच बसला धक्का

पारंपरिक महाराष्ट्रीयन पैठणी साडीवर बिकिनी ब्लाऊज, 37 वर्षीय अभिनेत्रीचा लूक पाहून प्रेक्षक थक्क, झाली प्रचंड ट्रोल, नंतर तिने ट्रोल करणाऱ्या जबरदस्त उत्तर.

| Updated on: Apr 09, 2026 | 1:59 PM
1 / 5
टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत सध्या विविध फॅशन ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत. मात्र यातील काही स्टाइल्स सर्वसामान्य प्रेक्षकांना पसंत पडत नाहीत. अशाच एका फॅशनमुळे 37 वर्षीय अभिनेत्री आकांक्षा पुरी सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत सध्या विविध फॅशन ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत. मात्र यातील काही स्टाइल्स सर्वसामान्य प्रेक्षकांना पसंत पडत नाहीत. अशाच एका फॅशनमुळे 37 वर्षीय अभिनेत्री आकांक्षा पुरी सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

2 / 5

आकांक्षा पुरी अलीकडेच एका फॅशन शोमध्ये साडीसोबत बिकिनी स्टाइल ब्लाउज परिधान करून रॅम्प वॉक करताना दिसली. या लूकमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी त्यावर टीका केली आहे.

3 / 5

ही अभिनेत्री सध्या तिच्या ‘Saadi Farmaish’ या म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या गाण्यात ती अश्मित पटेल याच्यासोबत दिसत आहे. हा प्रकार Bombay Times Fashion Week दरम्यान घडला. या फॅशन शोमध्ये प्रसिद्ध डिझायनर रोहित वर्मा यांच्या रॅम्प वॉकसाठी आकांक्षा पुरी गेस्ट म्हणून सहभागी झाली होती.

4 / 5

या कार्यक्रमात बिपाशा बासू देखील शोस्टॉपर म्हणून उपस्थित होती. मात्र सर्वांचे लक्ष आकांक्षाच्या हटके लूकवर खिळले. तिने पारंपरिक महाराष्ट्रीयन पैठणी साडी परिधान केली होती, पण त्यासोबत तिने घातलेला रिव्हीलिंग बिकिनी ब्लाउज हा चर्चेचा मुख्य विषय ठरला.

5 / 5

तिचा हा लूक प्रचंड ट्रोल झाला. ट्रोलिंगनंतर तिने यावर स्पष्टीकरण दिले. तिच्या मते, हा आउटफिट तिची वैयक्तिक निवड नव्हती तर डिझायनरचा विचार होता. ती म्हणाली, ही रोहित वर्मा यांचे क्रिएशन आहे. त्यांच्या टॅलेंटवर मला पूर्ण विश्वास आहे. त्यांनी हे डिझाइन विचारपूर्वक तयार केले असेल. एक कलाकार म्हणून मी त्यांच्या कामाचा आदर केला आणि आत्मविश्वासाने हा लूक कॅरी केला असं ती म्हणाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us