अक्षय कुमारच्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच गुंडाळला गाशा; चाहते नाराज

या चित्रपटात अक्षय कुमार गोरखा रेजिमेंटचे माजी मेजर जनरल इयान कार्डोझो यांची भूमिका साकारणार होता. परंतु आता हा चित्रपट बंद झाल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

| Updated on: Apr 16, 2026 | 8:41 PM
1 / 5
अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'भूत बंगला' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अक्षयने त्याच्या आणखी एका बहुचर्चित चित्रपटाबाबत मोठी अपडेट दिली आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी घोषित झालेला हा चित्रपट अखेर बंद पडल्याचं त्याने जाहीर केलं.

2 / 5
अक्षयने सांगितलं की, हा चित्रपट आता बनणार नाही. अक्षय कुमार एका वर्षात अनेक चित्रपट करण्यासाठी ओळखला जातो. इतकंच नाही तर तो त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची घोषणाही खूप लवकर करत असतो. असाच ट्रेंड पाच वर्षांपूर्वीही दिसून आला होता.

3 / 5
2021 मध्ये त्याने 'गोरखा' या चित्रपटाची घोषणा केली होती. या अधिकृत घोषणेसोबतच त्याने 'गोरखा'चा फर्स्ट लूक पोस्टरही शेअर केला होता. ज्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. यामध्ये अक्षय भारतीय लष्कराच्या गोरखा बटालियनमधील एका सैनिकाची भूमिका साकारणार होता.

4 / 5
अक्षयचा 'गोरखा' हा चित्रपट आता रद्द करण्यात आला असून तो प्रदर्शित होणार नाही. 'भूत बंगला' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षयने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक लाईव्ह सेशन घेतलं होतं. यावेळी त्याने चाहत्यांना सांगितलं की त्याचा 'गोरखा' हा चित्रपट बनवला जात नाहीये.

5 / 5
हा चित्रपट अधिकृतरित्या बंद झाल्याचं अक्षय कुमारने स्पष्ट केलं. 'गोरखा'चं दिग्दर्शन संजय पुरण सिंह चौहान करणार होते, तर आनंद एल राय याची निर्मिती करणार होते. हा चित्रपट अचानक का बंद पडला, यामागचं कारण मात्र अक्षयने स्पष्ट केलेलं नाही.

Follow Us