बॉलिवूडचे पाच सर्वात खतरनाक खलनायक, ज्यांना पाहून थिएटरमध्ये घाबरलेले प्रेक्षक, शेवटचा तर प्रचंड डेंजर

बॉलिवूडमध्ये अनेकदा चित्रपटातील हिरो पेक्षा त्यामधील खलनायकाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड लक्षात राहते. असेच पाच खलनायक ज्याची भूमिका पाहून थिएटरमध्ये प्रेक्षक घाबरायचे.

| Updated on: Apr 13, 2026 | 12:11 PM
1 / 6
बॉलिवूडमध्ये बहुतांश वेळा चित्रपटाचा केंद्रबिंदू हा हिरो असतो पण काही वेळा खलनायकच संपूर्ण चित्रपटावर छाप पाडतो. आपल्या जबरदस्त अभिनय, धडकी भरवणाऱ्या शैली आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्समुळे काही कलाकारांनी अशी खलनायकी भूमिका साकारली की प्रेक्षक त्यांच्याकडून नजर हटवू शकले नाहीत.

बॉलिवूडमध्ये बहुतांश वेळा चित्रपटाचा केंद्रबिंदू हा हिरो असतो पण काही वेळा खलनायकच संपूर्ण चित्रपटावर छाप पाडतो. आपल्या जबरदस्त अभिनय, धडकी भरवणाऱ्या शैली आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्समुळे काही कलाकारांनी अशी खलनायकी भूमिका साकारली की प्रेक्षक त्यांच्याकडून नजर हटवू शकले नाहीत.

2 / 6

अक्षय खन्नाने छावा या चित्रपटात मुघल बादशाह औरंगजेबाची क्रूर भूमिका साकारली. त्याच्या या भूमिकेतील थंडपणा आणि निर्दयता प्रेक्षकांना विशेष भावली.तसेच धुरंधर या चित्रपटात त्याने ‘रहमान डकैत’ची भूमिका साकारत पुन्हा एकदा खलनायकी अंदाजाने सर्वांना आश्चर्यचकित केले.

3 / 6

रणवीर सिंगने 'पद्मावत' मध्ये सुलतान अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली. हा त्याच्या कारकिर्दीतील पहिलाच निगेटिव्ह रोल होता. त्याच्या उर्जावान आणि विक्षिप्त अभिनयामुळे हा खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

4 / 6

संजय दत्तने 'बागी 4' मध्ये ‘चाको’ नावाचा धोकादायक खलनायकाची भूमिका साकारली. त्याच्या दमदार व्यक्तिमत्त्वामुळे ही भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.

5 / 6

रितेश देशमुखने रेड 2 मध्ये केंद्रीय मंत्री ‘दादा मनोहर भाई’ हा खलनायक साकारला. विनोदी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रितेशने या गंभीर भूमिकेत स्वतःची वेगळी छाप सोडली.

6 / 6

नवाजुद्दीन सिद्दीकीने थामा या हॉरर-कॉमेडी चित्रपटात ‘यक्षासन’ ही भूमिका साकारली. त्याच्या अभिनयातील तीव्रता आणि वेगळेपणा प्रेक्षकांना खूपच आवडला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us