Alia Bhatt: संतूर मॉम आलिया भट्टचा दुर्गा पूजेतील लूक चर्चेत; पाहून वाटणारच नाही, ती एका मुलीची आई
दुर्गा पूजेत आलिया भट्टच्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं! गुलाबी सिल्क साडी, निळा ब्लाऊज आणि पारंपरिक दागिन्यांमधील तिचा हा खास लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या मनमोहक अंदाजाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. पण आलियाच्या या लूकमधील खास गोष्ट नेमकी काय आहे? पाहा तिचे सुंदर फोटो!

सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट मुंबईतील 80व्या नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात दुर्गामातेच्या दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी तिने नेसलेल्या सुंदर पारंपरिक साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, तिच्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
या खास प्रसंगी आलियाने गुलाबी रंगाची सुंदर सिल्क साडी नेसली होती. साडीवरील सोनेरी जरीचे काम आणि आकर्षक काठ यामुळे तिच्या पारंपरिक पेहरावाला खास उठाव मिळाला.
गुलाबी साडीसोबत आलियाने निळ्या रंगाचा पफ स्लीव्हज असलेला ब्लाऊज परिधान केला होता.
आलियाने आपल्या साडीवर सोन्याचे झुमके, हातात सोन्याच्या बांगड्या घालून लूक पूर्ण केला. साध्या पण आकर्षक दागिन्यांमुळे तिच्या पारंपरिक सौंदर्यात अधिक भर पडली.
बांधलेले केस, त्यावर माळलेला गजरा आणि कपाळावरील छोटी निळी टिकली यामुळे आलियाचा लूक अधिक मोहक दिसत होता. हलक्या मेकअपमुळे तिच्या सौंदर्याला नैसर्गिक झळाळी मिळाली.
आलियाने तिच्या या खास लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ‘Shubho Pujo’ असे कॅप्शन दिले. तिच्या पारंपरिक स्टाइलला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.