‘वेलकम’ चित्रपटातील त्या पेटिंगचा अर्थ काय? 20 वर्षानंतर अनिल कपूरने सांगूनच टाकलं, अर्थ आहे खूपच खास

'वेलकम' चित्रपटातील अनिल कपूरच्या हातातील पेटिंगचा अर्थ काय? 20 वर्षांनंतर अनिल कपूरने सांगूनच टाकलं. अर्थ आहे खूपच खास.

| Updated on: Mar 06, 2026 | 11:40 AM
1 / 7
हिंदी सिनेमातील क्लासिक कॉमेडी चित्रपट 'वेलकम' मधील मजनू भाईने काढलेली प्रसिद्ध पेंटिंग आजही सोशल मीडियावर मीम्सच्या स्वरूपात प्रचंड लोकप्रिय आहे. या पेंटिंगमध्ये एक गाढव घोड्यावर स्वार झालेलं दाखवलं आहे.

2 / 7
अनेक वर्षांपासून लोक या पेंटिंगवर विनोद करत आले असले तरी त्यामागे एक वेगळी आणि खोल तत्त्वज्ञान दडलेले आहे. याबाबतचा खुलासा स्वतः अनिल कपूरने केला आहे.

3 / 7
अलीकडेच अक्षय कुमारने होस्ट केलेल्या Wheel of Fortune या शोच्या होळी स्पेशल एपिसोडमध्ये अनिल कपूर सहभागी झाला होता. कार्यक्रमादरम्यान एका प्रेक्षकाने सांगितले की तो अनिल कपूर आणि अक्षय कुमार या दोघांचाही मोठा चाहता आहे.

4 / 7
विशेषतः त्यांच्या ‘वेलकम’ चित्रपटाचा. त्याने चित्रपटातील त्या प्रसिद्ध पेंटिंगमागील अर्थ काय आहे असा प्रश्न अनिल कपूरला विचारला.

5 / 7
यावर उत्तर देताना अनिल कपूरने त्या पेंटिंगमागील कारण सांगितले. तो म्हणाला, 'या पेंटिंगमध्ये एक घोडा आणि एक गाढव दाखवले आहे. घोडा हा मेहनत, सक्रियता आणि प्रामाणिक कामाचे प्रतीक आहे. तर गाढव हे त्याच्या उलट म्हणजे कमी मेहनत करणाऱ्या किंवा आळशी व्यक्तीचे प्रतीक आहे. घोडा सर्व मेहनत करतो पण अनेकदा त्याचे श्रेय गाढव घेऊन जातो.'

6 / 7
अनिल कपूरने पुढे सांगितले की ही परिस्थिती अनेकदा ऑफिसमधील बॉस आणि कर्मचारी यांच्या नात्यासारखी असते. अनेक वेळा काम करणारा कर्मचारी मेहनत करतो पण त्याचे फळ किंवा क्रेडिट वरच्या पदावरील व्यक्तीला मिळते असं अनिल कपूरने सांगितले.

7 / 7
आजही सोशल मीडियावर या पेंटिंगवर आधारित असंख्य मीम्स तयार होतात. त्यामुळे ‘वेलकम’ चित्रपटातील हा प्रसंग आणि मजनू भाईंची पेंटिंग हिंदी सिनेमातील सर्वात संस्मरणीय आणि लोकप्रिय गोष्टींपैकी एक मानली जाते.

Follow Us