65 वर्षांपूर्वीचं आशा भोसले यांचं रोमँटिक गाणं, प्रपोजसाठी एकदम परफेक्ट, ऐकताच प्रत्येकजण होतो….

65 वर्षांपूर्वीच आशा भोसले यांचं रोमँटिक गाणं, जे प्रत्येक कपलसाठी आहे परफेक्ट. प्रपोज करण्यासाठी अनेकजण याच गाण्याचा करतात वापर, ऐकताच मन रोमँटिक होऊन जातं.

| Updated on: Apr 12, 2026 | 8:03 AM
1 / 5
आपल्या जीवनात संगीताला एक खास स्थान आहे. काही लोक गाणी ऐकताना आपल्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात तर काहींना त्यातून प्रेरणा मिळते. प्रत्येकाच्या आयुष्यात संगीताचं महत्त्व वेगवेगळं असतं.

आपल्या जीवनात संगीताला एक खास स्थान आहे. काही लोक गाणी ऐकताना आपल्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात तर काहींना त्यातून प्रेरणा मिळते. प्रत्येकाच्या आयुष्यात संगीताचं महत्त्व वेगवेगळं असतं.

2 / 5

भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारची गाणी गाऊन श्रोत्यांची मने जिंकली. चुलबुली, रोमँटिक, नशिली गाणी असोत किंवा गंभीर गझल, भजन आणि शास्त्रीय संगीतावर आधारित रचना. प्रत्येक ठिकाणी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे गाणी सादर केली.

3 / 5

आशा भोसले यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत कॅबरे आणि डिस्को गाण्यांना एक वेगळी उंची दिली. 'पिया तू अब तो आजा' आणि 'दम मारो दम' सारखी त्यांची गाणी आजही तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्या आवाजातली ऊर्जा आणि अभिव्यक्तीमुळे ही गाणी आजही ताजी वाटतात.

4 / 5

आशा भोसले यांच्या गाजलेल्या गाण्यांपैकी एक म्हणजे 'अभी ना जाओ छोड़कर'. सुमारे 65 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं हे गाणं हम दोनों या चित्रपटातील आहे. ४ मिनिट 8 सेकंद लांबीचं गाणं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या सुरेल आवाजात साकारलं आहे.

5 / 5

हे एक अत्यंत मधुर रोमँटिक गाणं आहे, ज्यात जुदाईच्या आधीच्या कोमल भावना अतिशय नाजूकपणे मांडल्या आहेत. प्रेमातील ओढ, न सोडण्याची विनंती आणि त्या क्षणातील भावनिक गोडवा या गाण्यातून प्रकर्षाने जाणवतो. हे गाणं प्रदर्शित होताच प्रचंड लोकप्रिय झालं आणि घराघरांत पोहोचलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us