4600 कोटींचं बजेट, 23 सुपरहिरो भिडणार एका खतरनाक व्हिलनशी! अमेरिकेआधी भारतात रिलीज होणार ‘हा’ हॉलिवूडचा सिनेमा

तब्बल 4600 कोटींचं बजेट, 23 सुपरहिरो आणि जगाला हादरवणारा एक खतरनाक खलनायक! या महायुद्धात कोण जिंकणार आणि कोणाचा होणार अंत? अमेरिकेआधी भारतात रंगणार या थराराची सुरुवात!

| Updated on: Oct 29, 2026 | 9:56 AM
1 / 6
हॉलिवूडमधील एका बहुप्रतीक्षित चित्रपटाची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. तब्बल हजारो कोटींच्या बजेटमध्ये तयार होणार्‍या या चित्रपटात अनेक लोकप्रिय सुपरहिरो एकत्र येऊन एका शक्तिशाली शत्रूशी दोन हात करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या एक दिवस आधी भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने भारतीय चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

हॉलिवूडमधील एका बहुप्रतीक्षित चित्रपटाची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. तब्बल हजारो कोटींच्या बजेटमध्ये तयार होणार्‍या या चित्रपटात अनेक लोकप्रिय सुपरहिरो एकत्र येऊन एका शक्तिशाली शत्रूशी दोन हात करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या एक दिवस आधी भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने भारतीय चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

2 / 6

हॉलिवूडचा बहुचर्चित सुपरहिरो चित्रपट ‘ॲव्हेंजर्स: डूम्सडे’ 17 डिसेंबर 2026 रोजी भारतात प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘ॲव्हेंजर्स: डूम्सडे’ या चित्रपटात हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर डॉक्टर डूम या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर ख्रिस इव्हान्स पुन्हा एकदा स्टीव्ह रॉजर्सच्या भूमिकेत दिसणार असल्याने मार्व्हलच्या चाहत्यांसाठी ही मोठी बातमी ठरली आहे. या दोन लोकप्रिय कलाकारांच्या एकत्र येण्यामुळे आगामी चित्रपटातील संघर्ष आणि कथानकाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

3 / 6

‘ॲव्हेंजर्स: डूम्सडे’मध्ये तीन वेगवेगळ्या विश्वांतील लोकप्रिय सुपरहिरो एका भयंकर संकटाचा सामना करताना दिसणार आहेत. या चित्रपटात सुमारे 23 सुपरहिरोंची एकत्रित ताकद एका धोकादायक शत्रूविरुद्ध उभी राहणार असल्याची चर्चा आहे. जगाला आणि अनेक विश्वांना वाचवण्यासाठी या सुपरहिरोंना एकत्र यावे लागणार असल्याने चित्रपटात अॅक्शन, थरार आणि मोठ्या संघर्षाची अपेक्षा आहे.

4 / 6

या चित्रपटात ख्रिस हेम्सवर्थ, पेड्रो पास्कल, पॉल रड, अँथनी मॅकी, फ्लॉरेन्स प्यू आणि सेबॅस्टियन स्टॅन यांसारखे प्रसिद्ध कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय टॉम हिडलस्टन, पॅट्रिक स्टीवर्ट, इयान मॅककेलन, व्हॅनेसा किर्बी, सिमू लिऊ आणि जोसेफ क्विन यांचाही चित्रपटातील कलाकारांमध्ये समावेश आहे. दिग्गज कलाकारांची मोठी फौज आणि वेगवेगळ्या सुपरहिरो विश्वांतील पात्रे एकत्र आल्याने हा चित्रपट मार्व्हलच्या चाहत्यांसाठी खास ठरण्याची शक्यता आहे.

5 / 6

‘ॲव्हेंजर्स: डूम्सडे’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे दिग्दर्शन अँथनी रुसो आणि जो रुसो यांनी केले आहे. सुपरहिरो विश्वातील मोठ्या संघर्षाची कथा, शक्तिशाली खलनायक आणि लोकप्रिय पात्रांची एकत्रित उपस्थिती हे या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. मार्व्हलच्या आगामी चित्रपटांमध्ये या चित्रपटाला महत्त्वाचे स्थान मिळण्याची अपेक्षा असून, त्याच्या प्रदर्शनाकडे जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

6 / 6

रॉबर्ट डाउनी ज्युनियर आणि ख्रिस इव्हान्स यांनी एका व्हिडिओ संदेशातून भारतीय चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि ‘ॲव्हेंजर्स: डूम्सडे’चा उल्लेख केला. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याऐवजी यावेळी कथा कदाचित उलट्या दिशेने जाईल, अशा आशयाच्या त्यांच्या वक्तव्यामुळे चित्रपटातील खलनायक आणि कथानकाबद्दल उत्सुकता वाढली आहे. या संदेशामुळे भारतीय चाहत्यांमध्ये चित्रपटाची चर्चा रंगली असून, डिसेंबर 2026 मधील प्रदर्शनासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us