AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार आवडत नसेल तर..; नसीरुद्दीन शाह यांच्यावर पुनीत इस्सार संतापले; थेट म्हणाले..

Naseeruddin Shah: नसीरुद्दीन शाह यांनी केंद्र सरकार आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यांवर आता अभिनेते पुनीर इस्सार यांनी बेधडक वक्तव्य केलं आहे. सरकार आवडत नसेल तर निवडणूक लढवा, असं थेट आव्हानच त्यांनी दिलं आहे.

सरकार आवडत नसेल तर..; नसीरुद्दीन शाह यांच्यावर पुनीत इस्सार संतापले; थेट म्हणाले..
पुनीत इस्सार आणि नसीरुद्दीन शाहImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 29, 2026 | 10:18 AM
Share

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि पुनीत इस्सार यांच्यातील वैचारिक मतभेद आता चर्चेचा विषय ठरले आहेत. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे नसीरुद्दीन शाह यांनी केंद्र सरकार आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यांवर अभिनेता पुनीत इस्सर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेल्या पुनीत यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ‘सरकार आवडत नसेल, तर निवडणूक लढवा आणि सरकारला हरवून दाखवा,’ अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे मनोरंजनविश्वात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

नसीरुद्दीन शाह यांच्याबद्दल बोलताना पुनीत इस्सार यांनी सर्वप्रथम त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला. नसीरुद्दीन शाह हे आपल्यापेक्षा ज्येष्ठ कलाकार असून, त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. ते एक उत्तम कलाकार आहेत, असंही पुनीत यांनी म्हटलं. मात्र, त्यांच्या राजकीय भूमिकांशी आपण सहमत नसल्याचं पुनीत यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या मते, सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तींनी देशातील विविध मुद्द्यांवर बोलताना निवडक भूमिका घेण्याऐवजी सर्व विषयांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहायला हवं. काही विशिष्ट विचारसरणीच्या मुद्द्यांवरच प्रतिक्रिया देणं योग्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भारत आणि जगासमोर अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्यापैकी किती मुद्द्यांवर नसीरुद्दीन शाह स्पष्टपणे आपली भूमिका मांडतात, असा प्रश्न पुनीत यांनी विचारला.

पुनीत इस्सार यांनी आपल्या वक्तव्यादरम्यान जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), डाव्या विचारसरणीशी संबंधित भूमिका आणि तुरुंगात असलेल्या आरोपींच्या समर्थनाचा मुद्दाही उपस्थित केला. काही व्यक्ती देशातील विविध घटनांकडे एकाच विचारसरणीतून पाहतात, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, नसीरुद्दीन शाह यांनी अलीकडेच दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. याआधी कोलकात्यातील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबतही त्यांनी भूमिका मांडली होती. विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि देशातील शैक्षणिक संस्थांच्या परिस्थितीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. याच पार्श्वभूमीवर पुनीत इस्सार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

नसीरुद्दीन शाह यांनी अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये स्वतःला ‘दिमागी नक्षल’ म्हणवून घेण्यास अभिमान वाटत असल्याचं सांगितलं होतं. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी टीका केली होती. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि मनोरंजनविश्वात चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
Congress : महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!