Sunset Destinations : सूर्यास्ताचा भन्नाट नजारा पाहायचाय? भारतातील ही 7 ठिकाणं नक्की पाहा
भारतात सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्रकिनाराच हवा असं नाही. कच्छच्या पांढऱ्या रणापासून जैसलमेरच्या वाळवंटापर्यंत अनेक ठिकाणी मावळत्या सूर्याचा अप्रतिम नजारा अनुभवता येतो.

Image Credit source: tv9 marathi
- भारतातील अशी 7 ठिकाणं जिथे सूर्यास्त फक्त पाहायचा नसतो तर मनात आणि कॅमेऱ्यात कायम साठवून ठेवायचा असतो.
- कच्छ रण, गुजरात पांढऱ्याशुभ्र मिठाच्या वाळवंटात मावळणारा सूर्य पाहणं. हा एक वेगळाचं अनुभव आहे. सूर्य जस जसा मावळतो तश्या त्याच्या केशरी, गुलाबी, सोनेरी रंगाच्या सफेद वाळूवर पडतात.त्यामुळे संपूर्ण परिसर सूर्यास्ताच्या रंगात रंगून जातो.
- गोकर्ण कर्नाटक गोव्याच्या गर्दीपेक्षा थोडं शांत वातावरण हवं असेल तर गोकर्णचा पर्याय उत्तम आहे. कुडले बीच आणि ओम बीचसारख्या ठिकाणी समुद्र,डोंगर आणि मावळतीच्या सूर्याचं सुंदर दृश्य पाहता येतं. शांत वातावरणामुळे सूर्यास्ताचा अनुभव खास होतो.
- कन्याकुमारी, तामिळनाडू भारताच्या दक्षिण टोकावर उभं राहून समुद्राच्या क्षितिजाकडे मावळणारा सूर्य पाहण्याचा अनुभवचं वेगळा आहे. कन्याकुमारीमध्ये अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर अश्या त्रिकोणी संगमाजवळ सूर्यास्त पाहता येतो. त्यामुळे हे ठिकाण sunset lovers साठी विशेष आर्कषण आहे
- वर्कला केरळा समुद्रकिनाऱ्यावरून नाही तर उंच कड्यावरून सूर्यास्त पाहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर वर्कला खूप खास आहे. वर्कला क्लिफवर उभं राहून समोर पसरलेल्या अरबी समुद्रावर मावळणारा सूर्य पाहता येतो. लालसर कडे, निळा समुद्र आणि बदलतं जाणारं आकाश हे दृश्य आठवणीत राहणारं आहे.
- जैसलमेर राजस्थान वाळवंटातील सूर्यास्त अनुभवायचा असेल तर जैसलमेरची सफर नक्की करा थारच्या वाळूत सूर्य मावळताना वाळूच्या टेकड्यांवर सोनेरी आणि लालसर छटा उमटतात. सूर्यास्ताच्या वेळी sand dunes वरचा नजारा अगदी सिनेमातल्या दृश्यासारखा दिसतो.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us