तुम्ही दररोज सकाळी किती वाजता उठता? वयानुसार योग्य वेळ काय?

निरोगी राहण्यासाठी फक्त पुरेशी झोप घेणे पुरेसे नाही, तर सकाळी योग्य वेळी उठणे देखील महत्त्वाचे आहे. वयानुसार सकाळी किती वाजता उठावे आणि ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे फायदे याबद्दल सविस्तर माहिती या लेखात वाचा.

| Updated on: May 11, 2026 | 1:55 PM
1 / 8
निरोगी राहण्यासाठी आपण किती तास झोपतो याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व आपण सकाळी किती वाजता उठतो यालाही आहे. विज्ञान आणि आयुर्वेदानुसार, पुरेशी झोप घेऊनही जर तुम्ही चुकीच्या वेळी उठत असाल, तर नकळतपणे तुम्ही गंभीर आजारांना निमंत्रण देता. आज आपण वयानुसार कोणी किती वाजता उठलं पाहिजे, याबद्दल जाणून घेऊया.

निरोगी राहण्यासाठी आपण किती तास झोपतो याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व आपण सकाळी किती वाजता उठतो यालाही आहे. विज्ञान आणि आयुर्वेदानुसार, पुरेशी झोप घेऊनही जर तुम्ही चुकीच्या वेळी उठत असाल, तर नकळतपणे तुम्ही गंभीर आजारांना निमंत्रण देता. आज आपण वयानुसार कोणी किती वाजता उठलं पाहिजे, याबद्दल जाणून घेऊया.

2 / 8

आयुर्वेदात सूर्योदयाच्या साधारण १ तास ३६ मिनिटे आधीच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त मानले जाते. ही वेळ साधारण पहाटे ४:०० ते ५:३० च्या दरम्यान असते. या वेळी उठल्याने शरीरातील वात दोषाचे संतुलन राहते, ज्यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो.

3 / 8

विज्ञानानुसार आपले शरीर एका जैविक घड्याळावर (Circadian Rhythm) चालते. सकाळी ६:०० ते ८:३० च्या दरम्यान शरीरात 'कॉर्टिसोल' या संप्रेरकाची पातळी वाढते, जे आपल्याला सक्रिय करते.

4 / 8

जर तुम्ही ९-१० वाजेपर्यंत झोपून राहिलात, तर शरीरातील मेलाटोनिनचे संतुलन बिघडते आणि दिवसभर सुस्ती जाणवते. वयानुसार शरीराची झोपेची गरज आणि उठण्याची योग्य वेळ बदलत असते.

5 / 8

६ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांच्या शारीरिक वाढीसाठी ९ ते ११ तासांची झोप आवश्यक असते. त्यांनी सकाळी ६:०० ते ७:०० च्या दरम्यान उठणे उत्तम ठरते. १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणांना ७ ते ९ तास झोप मिळायला हवी आणि त्यांनी सकाळी ५:३० ते ६:३० च्या दरम्यान उठावे.

6 / 8

नोकरी करणारे किंवा बिझनेस करणाऱ्यांना ७-८ तासांची झोप पुरेशी असते. त्यांची उठण्याची वेळ सकाळी ५:०० ते ६:०० च्या दरम्यान असावी. तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी ७-८ तास झोप घेऊन पहाटे ५:०० पूर्वी उठणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

7 / 8

पहाटेची वेळ ही ध्यान, अभ्यास आणि क्रिएटिव्ह कामासाठी सर्वोत्तम मानली जाते. या काळात वातावरणात ओझोनचे प्रमाण अधिक असल्याने ते फुफ्फुसे आणि मेंदूसाठी अमृतासारखे कार्य करते.

8 / 8

योग्य वेळी उठल्याने केवळ मानसिक शांतता मिळत नाही, तर पचनक्रिया सुधारून शरीरातील ऊर्जा पातळीही टिकून राहते. त्यामुळे केवळ झोप पूर्ण करणे पुरेसे नाही, तर निसर्गाच्या चक्रासोबत चालणे हेच दीर्घायुष्याचे सूत्र आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us