दिल्लीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी भूमी पेडणेकरची संतप्त प्रतिक्रिया, थेट म्हणाली- ‘आपण किती दिवस…’

दिल्लीतील अल्पवयीन मुलीवरील कथित अत्याचाराच्या घटनेवर अभिनेत्री भूमी पेडणेकर संतापली. थेट पोस्ट करत म्हणाली- 'आपण किती दिवस...'

| Updated on: Sep 01, 2026 | 7:25 PM
1 / 5
दिल्ली-एनसीआरमध्ये धावत्या स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय मुलीवर कथित सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर अभिनेत्री भूमी पेडणेकरने संताप व्यक्त केला आहे.

2 / 5
महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, भूमी पेडणेकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली.

3 / 5
भूमीने सोमवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली. महिलांच्या सुरक्षेबाबत वारंवार चर्चा होत असतानाही अशा घटना सातत्याने कशा घडू शकतात असा सवाल तिने उपस्थित केला.

4 / 5
'आपण हे वारंवार कसं घडू देऊ शकतो! ही लाजिरवाणी गोष्ट आहे,' अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

5 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी काश्मिरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर काही तासांतच बस चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप या दोघांना तिमारपूर परिसरातील पार्किंगमधून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us