
अभिनेत्री मनिषा कोईराला हिने आता देखील स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यातील काही फोटो पोस्ट केले आहेत.

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'Nature Walk' असं लिहिलं आहे. फोटोंमध्ये मनिषासोबत अन्य एक महिला देखील दिसत आहे.

मनिषा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहच्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर मनिषा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर 2.5 मिलियन नेटकरी फॉलो करतात तर, अभिनेत्री फक्त 1,374 नेटकऱ्यांना फॉलो करते.

वयाच्या 54 व्या वर्षी देखील मनिषा हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री नियमित वर्कआऊट करत स्वतःला फिट आणि ग्लॅमरस ठेवते.