बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीचं मोनोकिनीमध्ये फोटोशूट, पूलमधील फोटो तुफान चर्चेत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राने स्विमिंग पूलमध्ये काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिल्या दिलखेच पोज. सोशल मीडियावर रंगली फोटोंची चर्चा.

| Updated on: Jun 01, 2026 | 1:45 PM
1 / 5
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत आली आहे. प्रियंकाने नुकत्याच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही खास रविवारच्या सुट्टीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले असून त्याला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत आली आहे. प्रियंकाने नुकत्याच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही खास रविवारच्या सुट्टीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले असून त्याला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

2 / 5

प्रियंकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये पूलसाइड रिलॅक्स करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये ती अत्यंत आकर्षक दिसत असून तिचा आत्मविश्वासपूर्ण अंदाज चाहत्यांना भुरळ घालत आहे.

3 / 5

एका फोटोमध्ये ती पूलजवळ पोझ देताना दिसते तर एका व्हिडिओमध्ये केस झटकत मजेशीर अंदाजात कॅमेऱ्यासमोर उभी असल्याचे पाहायला मिळते. फेस मास्क लावलेला फोटो, फळांचा आस्वाद घेतानाचे क्षण तसेच तिच्या टीमची झलकही या पोस्टमध्ये पाहायला मिळाली.

4 / 5

त्यामुळे शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ती स्वतःसाठीही वेळ देत असल्याचे स्पष्ट होते. सध्या प्रियंका दिग्दर्शक राजामौली यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या पोस्टमधील अनेक फोटो शूटिंगदरम्यानच्या विश्रांतीच्या क्षणांचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

5 / 5

कामाबद्दल बोलायचे झाल्यास, प्रियंका शेवटची The Sky Is Pink या चित्रपटात दिसली होती. त्याआधी तिने बाजीराव मस्तानीमधील भूमिकेद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता दीर्घ विश्रांतीनंतर ती पुन्हा एका मोठ्या पॅन-इंडिया प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us