10 वर्षांनी लहान असणाऱ्या पतीसोबत प्रियंका चोप्रा झाली रोमँटिक, ‘त्या’ फोटोवरून तर नजर हटणार नाही

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. ज्यामधील तिचा रोमँटिक अंदाज प्रचंड चर्चेत आला आहे.

| Updated on: Feb 09, 2026 | 6:06 PM
1 / 6
बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. केवळ प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती सतत चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरते.

बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. केवळ प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती सतत चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरते.

2 / 6

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या प्रियंकाने आता आपल्या पती निक जोनस याच्यासोबतचे काही खास आणि रोमँटिक फोटो शेअर केले असून हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

3 / 6

प्रियंका चोप्राने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. यामध्ये ती निक जोनससोबत अतिशय प्रेमळ आणि कोजी अंदाजात दिसत आहे. या फोटोंमधून दोघांमधील घट्ट नातं आणि सुंदर बॉन्डिंग स्पष्टपणे जाणवत आहे.

4 / 6

कधी प्रियंका निकच्या मिठीत विसावलेली दिसते आहे तर कधी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. या दोघांचा हा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूपच भावला आहे.

5 / 6

विशेष म्हणजे, हे फोटो शेअर करताना प्रियंकाने एक भावनिक आणि लांबलचक कॅप्शनही लिहिले आहे. तिने या कॅप्शनमध्ये स्वतःला अत्यंत नशीबवान असल्याचे सांगितले आहे. 'माझ्या आयुष्यात निकसारखा जोडीदार मिळणं हे माझं भाग्य आहे. तो माझ्या आनंदाचं मोठं कारण आहे' असे प्रियंकाने म्हटलं आहे.

6 / 6

निक जोनस तिच्यावर मनापासून प्रेम करतो आणि तिला पूर्ण सन्मान देतो. या शब्दांमधून तिचं निकवरील प्रेम आणि विश्वास स्पष्ट दिसून येतो. प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांनी 2018 साली लग्न केले होते. त्यांच्या लग्नाची चर्चा देश-विदेशात मोठ्या प्रमाणात झाली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us