दिग्दर्शकाचा अभिनेत्रीला विचित्र सल्ला, ऐकून अभिनेत्री झालेली थक्क, मागणी ऐकून तुम्हालाही येईल संताप

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला एका चित्रपटातील गाण्याच्या शूटिंग दरम्यान दिग्दर्शकाने दिलेला विचित्र सीन देण्याची मागणी. अभिनेत्रीने दिलेला स्पष्ट नकार.

| Updated on: Apr 17, 2026 | 12:10 PM
1 / 5
60-70 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वहीदा रहमान या अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्या सौंदर्याबरोबरच अभिनयाने देखील प्रचंड प्रसिद्ध होत्या. मात्र त्यांच्या कारकिर्दीत एक असा प्रसंग घडला होता जो आजही ऐकून आश्चर्य वाटते.

60-70 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वहीदा रहमान या अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्या सौंदर्याबरोबरच अभिनयाने देखील प्रचंड प्रसिद्ध होत्या. मात्र त्यांच्या कारकिर्दीत एक असा प्रसंग घडला होता जो आजही ऐकून आश्चर्य वाटते.

2 / 5

1965 साली प्रदर्शित झालेला 'गाइड' हा चित्रपट हिंदी सिनेमातील एक क्लासिक मानला जातो. या चित्रपटाची इंग्रजी आवृत्तीही तयार करण्यात आली होती. याच इंग्रजी व्हर्जनच्या शूटिंगदरम्यान एक विचित्र प्रसंग घडला.

3 / 5

एका जुन्या मुलाखतीत वहीदा रहमान यांनी सांगितले की, शूटिंगदरम्यान दिग्दर्शकांनी त्यांना नृत्य करताना सापाला किस करण्यास सांगितले. या सीनमध्ये त्या पूर्णपणे नृत्यात तल्लीन झाल्यासारख्या दिसायला हव्यात अशी अपेक्षा होती.

4 / 5

ही मागणी ऐकताच वहीदा रहमान चकित झाल्या. त्यांनी लगेचच विचारले, मी हे कसं करू शकते? त्यावर दिग्दर्शकांनी सांगितले की, तू भारतीय मुलगी आहेस, तू हे का करू शकत नाहीस? यावर त्यांनी अत्यंत ठाम आणि आत्मसन्मानाने उत्तर दिले, भारतीय असल्याचा अर्थ असा नाही की आपण सापांशी खेळतो.

5 / 5

दिग्दर्शकांनी हा सीन प्रेक्षकांना आवडेल आणि टाळ्यांचा कडकडाट होईल असे सांगून पटवण्याचा प्रयत्न केला पण वहीदा रहमान यांनी हा सीन करण्यास स्पष्ट नकार दिला. ‘गाइड’ हा चित्रपट हिंदीत प्रचंड गाजला आणि आजही तो क्लासिक म्हणून ओळखला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us