बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
बॉलिवूडमधील 5 सर्वात खडूस सासू, ज्यांचं नाव जरी ऐकलं तरी अंगावर येतो काटा. त्यांच्या भूमिकेचं झालेलं प्रचंड कौतुक. शेवटची सासू तर प्रचंड खडूस.

इंडस्ट्री असो किंवा सामान्य आयुष्य, सासू-सुनेचं नातं नेहमीच गुंतागुंतीचं आणि कधी कधी तणावपूर्ण मानलं जातं. बॉलिवूड चित्रपटांमध्ये या नात्याचं नाट्यमय आणि प्रभावी चित्रण केलं गेलं आहे.

अनेक अभिनेत्रींनी पडद्यावर खडूस सासूची भूमिका इतक्या ताकदीने साकारली की प्रेक्षकांच्या मनात त्यांची वेगळीच छाप पडली. चला तर मग जाणून घेऊयात अशाच पाच सासूंच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींबद्दल.

सुरेखा सिकरी यांचं नाव या यादीत विशेष महत्त्वाचं आहे. त्यांनी चित्रपटांपासून टीव्ही मालिकांपर्यंत खडूस सासूच्या भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यांच्या अभिनयातील तीव्रता आणि वास्तवतेमुळे त्या प्रेक्षकांच्या मनात कायम राहिल्या.आजही त्यांच्या भूमिका लक्षात राहतात.

हिणी हत्तंगडी यांनीही अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. पडद्यावर त्या खडूस सासू म्हणून सुनेवर हुकूम गाजवताना आणि त्यांना घाबरवताना दिसल्या. आजही त्या अभिनय क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं जातं.

नादिरा या देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले असून, प्रामुख्याने नकारात्मक भूमिका साकारल्या. त्यांच्या सासूच्या भूमिका विशेष गाजल्या आणि त्यांनी या भूमिकेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री बिंदू यांनी आपल्या दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खडूस सासूची भूमिका साकारली आणि त्या भूमिकांमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांची सासूची शैली प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी ठरली.

अरुणा ईरानी यांचे नावही खतरनाक सासूंच्या यादीत अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी कधी सासू तर कधी सावत्र आई बनून पडद्यावर आपल्या सुनेवर कठोर वागणूक दाखवली. चित्रपटांबरोबरच त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले.