या अभिनेत्रीच्या नावामुळे चित्रपट व्हायचा सुपरहिट, प्रत्येक निर्मात्यांची पहिली पसंत, चित्रपटाच्या बजेटच्या 5 पट घेयची मानधन
या अभिनेत्रीच्या नावावर चालायचे चित्रपट, प्रत्येक निर्मात्याची या अभिनेत्रीला होती पहिली पसंती. चित्रपटाच्या बजेट पेक्षा जास्त घेयची मानधन. कोण आहे ती अभिनेत्री?

आजच्या काळात अभिनेत्री एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचे मानधन घेतात. मात्र, अनेक दशकांपूर्वीच भारतीय चित्रपटसृष्टीत एका अभिनेत्रीने मानधनाचे सर्व विक्रम मोडत इतिहास रचला होता. ही अभिनेत्री म्हणजे कानन देवी. त्यांना भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक मानले जाते.

1930 आणि 1940 च्या दशकात कानन देवी या सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. उपलब्ध माहितीनुसार, त्या एका चित्रपटासाठी तब्बल 5 लाख रुपये, तर एका गाण्यासाठी 50 हजार ते 1 लाख रुपये मानधन घेत असत.

त्या काळात अनेक चित्रपटांचे संपूर्ण बजेटच 15 ते 20 हजार रुपयांच्या आसपास असायचे. त्यामुळे त्यांच्या मानधनाची त्या काळात मोठी चर्चा होती. आजच्या आर्थिक मूल्यानुसार पाहता, कानन देवी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली 'कोट्यधीश' अभिनेत्री मानले जाते.

अभिनयासोबतच कानन देवी उत्कृष्ट गायिकाही होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 57 चित्रपटांमध्ये अभिनय केला, तर जवळपास 40 गाणी गायली. के.एल. पुरुषप्रधान चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या कानन देवी यांना त्या काळात 'मॅडम' म्हणूनही ओळखले जात असे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले होते. आजही कानन देवी यांचे नाव भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रभावशाली आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून आदराने घेतले जाते.