
उत्तर प्रदेशातील बांदा-झांसी-कानपूर रेल्वे मार्गावर केन नदीवर भूरागढ दुर्गाजवळ 158 वर्ष जुना पूल आहे. इंग्रजांनी 1965 मध्ये हा पूल बांधला होता. त्यांचे वयोमर्यादा 100 वर्ष निश्चित केली होती. त्यानंतर शंभर वर्षांनी त्यांची तपासणी करण्यात आली.

केंद्रीय पथकाने केन नदीवरील पुलाची तपासणी केली. त्याची परिस्थिती चांगली आढळली. त्यामुळे त्या पुलास पुन्हा 50 वर्षांसाठी मंजुरी देण्यात आली. 2015 मध्ये वाढवलेली मर्यादी संपली.

2015 नंतर पुन्हा पुलाचे स्ट्रक्चर ऑडीट केंद्रीय टीमने केले. त्यात त्या पुलाची परिस्थिती सुस्थितीत असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे पुन्हा 50 वर्षांसाठी पूल वापरण्यास मंजुरी देण्यात आली. या पुलावरुन रोज दोन डजनपेक्षा जास्त प्रवासी आणि मालगाडी रेल्वे जात आहेत.

पुलाची तपासणी आता प्रत्येक महिन्यात केली जाते. तपासणीत कुठेही काही त्रुटी आढळून आली नसल्याचे स्टेशन मास्तर एस. के. शिवहरे यांनी सांगितले. तपासणीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इतिहास आणि बांधकामाचा दर्जामुळे आज हा पूल प्रेरणादाई ठरत आहे. ब्रिटीश काळात बांधण्यात आलेल्या या पुलाचा अभियांत्रिकी आणि बांधकाम दर्जा 158 वर्षांनंतरही उत्कृष्ट आहे. केन नदीवर बांधलेला हा पूल रेल्वेच्या ऐतिहासिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून एक अनमोल वारसा आहे.