AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता, मनी प्लांट चोरून लावल्याने खरंच श्रीमंत होता येतं का? वास्तूशास्त्र म्हणतं…

अनेकांचा असा समज आहे की, मनी प्लांट चोरून लावल्याने घरात श्रीमंती येते. एवढंच नाहीतर, श्रीमंत व्यक्तीच्या घरातील मनी प्लांट चोरून लावल्याने आपल्या घरात देखील पैसा खेळतो... याबद्दल वास्तूशास्त्र काय म्हणतं जाणू घ्या...

काय सांगता, मनी प्लांट चोरून लावल्याने खरंच श्रीमंत होता येतं का? वास्तूशास्त्र म्हणतं...
| Updated on: Mar 15, 2026 | 3:30 PM
Share

घरी मनी प्लांट लावल्याने संपत्ती आणि नशीब फळळतं असं अनेक लोक मानतात. पण, या रोपाबद्दल काही विचित्र समजुती देखील आहेत. त्यातील मुख्य म्हणजे तुम्ही चोरी करून मनी प्लांट लावलेलं चांगलं असतं. काही लोकांचा असा विश्वास आहे की, जर तुम्ही श्रीमंत लोकांच्या घरातून एक छोटी फांदी चोरून तुमच्या घरात लावली तर त्यांची संपत्ती तुमच्या घरात येईल. तर यात किती तथ्य आहे? वास्तुशास्त्र याबद्दल काय म्हणते? चला येथे जाणून घेऊया..

वास्तुशास्त्रानुसार, चोरी करणं चुकीचं आहे. त्यामुळे मनी प्लांट देखील कधीही चोरी करू नये. चोरी करणं हे एक चुकीचे कृत्य आहे, ज्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. चुकीच्या पद्धतीने आणलेले रोप घरात सकारात्मक ऊर्जा देणार नाही आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, यामुळे आर्थिक समस्या देखील उद्भवू शकतात. केवळ स्वतःच्या पैशाने हे रोप खरेदी करून लावल्याने पूर्ण परिणाम मिळेल. पैसे देऊन हे रोप खरेदी करणं आणि लावणं सर्वात जास्त शुभ आहे. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो… असं देखील म्हणतात.

घराच्या आग्नेय दिशेला मनी प्लांट ठेवणे नेहमीच शुभ असते. ही दिशा भगवान गणेशाच्या अधिपत्याखाली असते आणि शुक्र ग्रहाच्या अधिपत्याखाली असते. त्यामुळे ती संपत्ती आकर्षित करते. पण, मनी प्लांट ईशान्य दिशेला अजिबात ठेवू नये. तज्ज्ञांचा असा सल्ला आहे की, मनी प्लांटच्या वेली कधीही खाली पडू नयेत, तर त्या वरच्या दिशेने चढताना दिसाव्यात, तरच आर्थिक वाढ होईल. मनी प्लांटच्या वेली विकासाचं प्रतीक आहेत. म्हणून, जमिनीला स्पर्श करून वर चढू नये म्हणून काही आधार दिला पाहिजे. खाली लटकणाऱ्या वेली आर्थिक नुकसानाचं लक्षण मानल्या जातात.

झाड नेहमी हिरवे ठेवावे. जर पाने सुकली किंवा पिवळी झाली तर ती ताबडतोब काढून टाकावीत. वाळलेले रोप घरात दुर्दैव आणते. सकाळी किंवा संध्याकाळी मनी प्लांट लावणं चांगलं असतं. आर्थिक समृद्धीसाठी शुक्रवारी मनी प्लांट लावणं शुभ मानलं जातं.

वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांटवर ओतलेल्या पाण्यात थोडे दूध टाकल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होते असं मानलं जातं. मनी प्लांट हे केवळ एक सुंदर रोप नाही तर ते एक शक्तिशाली वास्तु साधन आहे. जर ते योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने लावले तरच तुमच्या घरात संपत्ती स्थिर राहील. असा विश्वास आहे की हे रोप कोणालाही भेट म्हणून देऊ नये, कारण जर ते अशा प्रकारे दिले तर तुमच्या घरातील संपत्ती इतरांकडे जाईल…. असं देखील म्हणतात.

Follow Us
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील बड्या नेत्याने सांगितलं त्या भेटीगाठीचं गुपित