Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशातच आता यातीला संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर या दोन खासदारांना केंद्रात दीड-दीड वर्ष मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता दिल्लीचे दार या नेत्यांसाठी उघडतील की काय? अशा चर्चा आहेत. सध्या ठाकरे गटातील 6 बंडखोर खासदार मुंबईत परतले असून नंदनवन येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. या भेटीनंतर ते शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती, त्यानंतर काही दिवसांपूर्वी 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. यात खासदार संजय जाधव आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश होता. आता या खासदारांना शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मंत्रिपद दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघांना दीड-दीड वर्षे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद दिले जाणार असल्याचे समोर आले आहे.
आज बंडखोर खासदार मुंबईत दाखल झाले, यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या खासदारांवर सडकून टीका केली आहे.
Published on: Jun 22, 2026 04:21 PM
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,

