AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सापांपासून वाचण्याचा सर्वात रामबाण उपाय; आदिवासींनी सांगितली सोपी ट्रीक, साप पुन्हा घराजवळ सुद्धा दिसणार नाही

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, त्यामुळे सापांचा धोका देखील वाढला आहे, या काळात साप मोठ्या प्रमाणात बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये देखील वाढ होते. आदिवासी लोकांनी एक सोपे ट्रिक सांगितली आहे, ज्याचा वापर करून आपण सापांपासून आपलं संरक्षण करू शकतो.

सापांपासून वाचण्याचा सर्वात रामबाण उपाय; आदिवासींनी सांगितली सोपी ट्रीक, साप पुन्हा घराजवळ सुद्धा दिसणार नाही
snake Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 22, 2026 | 5:19 PM
Share

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, पावसाळ्यामध्ये सापांच्या बिळात पाणी शिरल्याने ते बिळाबाहेर पडतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप नेहमी कोरड्या आणि अंधाऱ्या जागेचा शोध घेत असतात. अनेकदा तुमच्या घरात देखील त्यांना अशी जागा सापडू शकते. त्यामुळे साप घरात शिरतात. साप घरात शिरल्यानंतर ते अंधाऱ्या आणि अडचणीच्या जागी लपून बसतात. अशावेळी आपलं थोडं जरी दुर्लक्ष झालं तर आपल्यासोबत धोका होऊ शकतो, सर्पदंशाची शक्यता असते. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे साप स्वत:हून कधीही तुमच्यावर हल्ला करत नाही मात्र त्याला जर धोका जाणवला किंवा ही आपली शिकार आहे, असा त्याचा समज झाला तर तो तुमच्यावर हल्ला करू शकतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात सतर्क रहाणं गरजेचं असतं.

भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत, मात्र त्यातील काही प्रजातीच या विषारी आहेत, ज्यामध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरसे अशा काही प्रजातीचे नावं आपल्याला सांगता येतील. पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा सापांचं दर्शन होतं. जर तुम्हाला साप दिसलाच तर सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे तुमच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो. सापाची माहिती ही सर्पमित्रांना द्या, ते सापांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी सोडतील.

सापांपासून पावसाळ्यात स्वत:च संरक्षण कसं करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. विशेष: जे लोक ग्रामीण भागांमध्ये राहतात, किंवा जंगल परिसरात राहतात. त्यांना सापांचा अधिक धोका असतो. यावर एक सोपी ट्रीक आहे, ती म्हणजे तुम्ही जर घरात मांजर पाळली तर तुमचं सापांपासून संक्षण होईल. मांजरीचे डोळे हे खूप  तीक्ष्ण असतात, मांजर अंधारात देखील पाहू शकते, त्यामुळे साप कुठेही अंधारात लपून बसला असेल तरी तो तिच्या दृष्टीस पडतो आणि ती त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे तुम्ही सावध होतात. शक्यतो ज्या घरात मांजर असते, त्या घरात साप फिरकत देखील नाही,  जे लोक ग्रामीण भागात राहतात किंवा जे आदिवासी आहेत, जे जंगल परिसरात राहतात, ते आपल्या घरात मांजर पाळतातच, त्यामुळे सापांपासून घराचं संरक्षण होतं.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा