AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत

मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत

| Updated on: Jun 22, 2026 | 3:40 PM
Share

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या हालचालींना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बंडखोर खासदार मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील बंडखोर खासदारांच्या शिंदे पक्षातील प्रवेशाच्या हालचालींना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बंडखोर खासदार मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संतोष बांगर यांनी सांगितले की, येत्या एक-दोन दिवसांत संबंधित खासदारांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. या स्वागतासाठी शिंदे गटाचे हजारो शिवसैनिक उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. “ज्या प्रकारचे नेतृत्व या खासदारांना अपेक्षित होते, ते नेतृत्व त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मिळाले आहे. त्यामुळे ते पुढे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतील,” असे बांगर म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाकडून बंडखोर खासदारांवर टीका करण्यात येत असून, त्यांना या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतील, अशी प्रतिक्रिया काही नेत्यांनी दिली आहे. यावर बोलताना बांगर यांनी पलटवार केला. “कोणाला काय भोगावे लागते आहे, हे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत कोणाचे दिवस चांगले आहेत आणि कोणाचे वाईट, हे जनतेने स्पष्टपणे दाखवून दिले आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी ठाकरे गटाच्या भवितव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, बांगर यांनी सूचक इशारा दिला. “आगे आगे देखो होता है क्या,” असे म्हणत त्यांनी आणखी मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत दिले.

विशेष म्हणजे, “ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असून ऑपरेशन टायगर 2 देखील होणार,” असे वक्तव्य करत संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आणले आहे.

या वक्तव्यानंतर शिवसेनेतील आणखी काही नेते किंवा पदाधिकारी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना नव्याने बळ मिळाले असून, आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 22, 2026 03:40 PM

Follow Us