मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू असतानाच पक्षातील घडामोडींना आणखी वेग आला आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली असून, हे सर्व खासदार शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू असतानाच पक्षातील घडामोडींना आणखी वेग आला आहे. ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली असून, हे सर्व खासदार शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीला तीन आमदार अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संजय पोतनीस, आमदार संजय दरेकर आणि आमदार राहुल पाटील हे बैठकीस उपस्थित नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पक्षातील आणखी काही नेते किंवा आमदार वेगळी भूमिका घेणार का, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
याआधी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला नऊपैकी केवळ चार खासदार उपस्थित राहिल्याने पक्षातील अस्वस्थता उघड झाली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, मुंबईतील बैठकस्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, बैठकीत पक्षाच्या पुढील रणनीतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. खासदारांच्या बंडानंतर आता आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींमुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Jun 22, 2026 04:40 PM
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या

