महाराष्ट्र हादरला! 58 वर्षीय शिक्षकाचा 3 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार; प्रकरण समोर येताच…

बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकानेच तीन विद्यार्थिनींवर अत्याचार केला आहे. या घनटेनंतर

| Updated on: Apr 08, 2026 | 7:12 PM
1 / 5
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींसोबत 58 वर्षीय शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे.

2 / 5
आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यावर गावातील नागरिकांनि शेकडोच्या संख्येने शाळेकडे धाव घेतली. नराधम शिक्षकाला नागरिकांनी तसेच महिलांनी या शिक्षकाला चागलाच चांगला चोप दिला.

3 / 5
या घटनेची माहिती डोनगाव पोलिसांना देण्यात आली व पोलिसांनी संशयित आरोपी शिक्षकाला (महादेव आत्माराम मानतोडे) ताब्यात घेतलं. गावकरी पोलिसांना या शिक्षकाला घेऊन जाण्यास मज्जाव करत होते.

4 / 5
वाद वाढू नये म्हणून पोलिसांनी ग्रामस्थांना समजावून आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या पीडित मुलींचा जबाब घेणे सुरू आहे. पीडित मुलींच्या जबाबानंतर गुन्हा दाखल होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

5 / 5
विशेष म्हणजे हा नराधम शिक्षक येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे. सध्या डॉनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

Follow Us