सलग दुसऱ्या दिवशी एसटी बस दरीत कोसळली, कसा झाला अपघात

राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला आहे. बुधवारी नाशिकमधील सप्तश्रृंगी गडावरुन बस ४०० फूट दरीत कोसळली होती. त्यानंतर गुरुवारी भीमाशंकरवरुन येणाऱ्या बसचा अपघात झाला.

Jitendra Zavar | Updated on: Jul 13, 2023 | 11:02 AM
1 / 6
नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर बुधवारी एसटीचा भीषण अपघात झाला आहे. देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची बस थेट दरीत कोसळली होती. ४०० फूट दरीत कोसळलेल्या याबसमधील एक जणांचा मृत्यू झाला. तर २५ जण जखमी झाले होते.

नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर बुधवारी एसटीचा भीषण अपघात झाला आहे. देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची बस थेट दरीत कोसळली होती. ४०० फूट दरीत कोसळलेल्या याबसमधील एक जणांचा मृत्यू झाला. तर २५ जण जखमी झाले होते.

2 / 6

नाशिकमधील ही घटना ताजी असताना पुन्हा गुरुवारी बसचा अपघात झाला. भीमाशंकरवरुन कल्याणला जाणाऱ्या एस टी बसचा अपघात झाला.

3 / 6

गिरवली गावाजवळ दरीत एसटी बस पलटी झाल्याची घटना गुरुवारी घडली. या बसमधून ३५ प्रवाशी प्रवास करत होते. अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.

4 / 6

बसमधील जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर घोडेगाव ग्रामीण रुग्णालयमध्ये उपचार सुरू आहे.

5 / 6

घोडेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. सरळ दोन दिवसांत दोन बसेस दरीत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

6 / 6

बस अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us