PHOTO | प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’च्या थुकरटवाडीत अवतरणार दिग्गज मंडळी!

‘चला हवा येऊ द्या’मध्ये येता आठवडा प्रजासत्ताक दिन विशेष आठवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:14 PM, 22 Jan 2021
1/6
‘कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे’, असं म्हणत गेली 6 वर्षे ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र, तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
2/6
‘चला हवा येऊ द्या’मध्ये येता आठवडा प्रजासत्ताक दिन विशेष आठवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
3/6
याच अनुषंगाने 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील, जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम, डॉ. तात्याराव लहाने आणि ग्लोबल पुरस्कारप्राप्त रणजित डिसले गुरुजी असे दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत.
4/6
यावेळी मंचावर हे विविध क्षेत्रातील दिग्गज आपले अनुभव व्यक्त करताना दिसतील.
5/6
नेहमीप्रमाणे ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर धमाल पाहायला मिळणार आहे.
6/6
यावेळी ‘हवा येऊ द्या’च्या मंचावर न्यायालय अवतरणार आहे. यात कोणावर कोणते आरोप होणार आणि त्यातून काय धमाल येणार यासाठी सगळे प्रेक्षक उत्सुक आहेत.